AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धीवर भीषण अपघात, कारमधील अख्खं कुटुंब संपलं, चिमुकलीसह पाच जणांवर काळाचा घाला

समृद्धी महामार्गाच्य चॅनेल नंबर 105 च्या नजीक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

समृद्धीवर भीषण अपघात, कारमधील अख्खं कुटुंब संपलं, चिमुकलीसह पाच जणांवर काळाचा घाला
amravati samruddhi mahamarg accidentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 28, 2026 | 4:07 PM
Share

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्ग झाल्यामुळे राज्यातील दळणवळण खूप सोपे झाले आहे. सामान्यांचे प्रवासाचे अनेक तास वाचले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही अडथळ्याविना समृद्धी महामार्गावरून प्रवास करता येतो. म्हणूनच इप्सित स्थळी लवकर पोहोचायचे असेल तर समृद्धी महामार्गाचा सर्रास वापर केला जातो. परंतु याच समृद्धी महामार्गावर याआधी अनेक भीषण आणि धक्कादायक अपघात झालेले आहेत. वेगात वाहन आल्याने काही वेळा अनेकांचा मृत्यू झाल्याचा घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, आता याच समृद्धी महमार्गावर मन सुन्न करणारी घटना घडली आहे. वॅगनर कारने प्रवास करणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचाच एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. याच अपघातत मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. या अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 105 च्या जवळ एक भीषण अपघात झाला आहे.  कार ट्रकवर आदळल्याने ही भीषण घटना घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणइ एका मुलीचा समावेश आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या टोलनाका परिसरात ही घटना घडली आहे.

चंद्रपूरहून मुंबईत जात होते पाच जण

मिळालेल्या माहितीनुसार वॅगनर कारमद्ये बसून पाच जण चंद्रपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होते. मात्र पवासादरम्यान, या कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की यात कारचा चक्काचूर झाला आहे. कारमधील पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात नेता येईल का? यासाठी प्रयत्न केला जात होता. परंतु या अघातात कारमधील पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, आता या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या पाच जणांच्या कुटुंबीय, नातेवाईकांना बळ मिळो, अशी प्रार्थना केली जात आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत