कोणाची कॉमेंट्री आवडेल? वर्ल्डकपसाठी समालोचकांची यादी जाहीर

| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

मुंबई : येत्या 30 मेपासून इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या समालोचनासाठी अर्थात कॉमेंट्रीसाठी आयसीसीने यादी जाहीर केली आहे. शिवाय आपली ब्रॉडकास्ट रणनीतीही तयार केली आहे. क्रिकेट सामन्यांच्या कॉमेंट्रीच्या यादीत तीन भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये माजी कर्णधार सौरभ गांगुली, संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले यांचा समावेश आहे. गेल्यावेळी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात […]

कोणाची कॉमेंट्री आवडेल? वर्ल्डकपसाठी समालोचकांची यादी जाहीर
Follow us on

मुंबई : येत्या 30 मेपासून इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या समालोचनासाठी अर्थात कॉमेंट्रीसाठी आयसीसीने यादी जाहीर केली आहे. शिवाय आपली ब्रॉडकास्ट रणनीतीही तयार केली आहे. क्रिकेट सामन्यांच्या कॉमेंट्रीच्या यादीत तीन भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये माजी कर्णधार सौरभ गांगुली, संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले यांचा समावेश आहे.

गेल्यावेळी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला पाचव्यांदा विश्वचषक मिळवून देणारा माजी कर्णधार मायकल क्लार्क यंदा कॉमेंट्री करताना दिसणार आहे.

कॉमेंटेटरच्या यादीत कुणाची नावे?

आयसीसीच्या कॉमेंटेटरच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क, मार्क निकोलस, इंग्लंडचा नासिर हुसैन, इयान बिशप, मेलेनी जोन्स, कुमार संगकारा, मायकल एथर्टन, एलिसन मिशेल, ब्रेंडन मॅक्युलम, ग्रॅमी स्मिथ, वासिम आक्रम अशी दिग्गजांची नावं आहेत.

ICC World Cup 2019 LIVE : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, रायुडू, पंत बाहेर  

याशिवाय शॉन पोलॉक, मायकल होल्डिंग, ईशा गुहा, पोमी मांगवा, सायमन डाऊल, ईयान स्मिथ, रमीझ राजा, अथर अली खान आणि इयान वॉर्ड यांचाही समालोचकांच्या यादीत समावेश आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल,  कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या,  रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी

एकदिवसीय विश्वचषकाला (ICC Cricket World Cup 2019)  30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे.

संबंधित बातम्या 

‘WORLD CUP टीममध्ये दुखापतग्रस्त केदार जाधव ऐवजी ऋषभ पंतला संधी द्यावी’  

…म्हणून दिनेश कार्तिकला वर्ल्डकप टीममध्ये घेतलं : विराट कोहली  

अंबाती रायुडूची निवड न झाल्याने ICC ही थक्क, स्वत: रायुडूची आकडेवारी BCCI ला दिली!  

….म्हणून पंतऐवजी दिनेश कार्तिकची वर्ल्ड कपसाठी निवड!   

ICC World Cup 2019 LIVE : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, रायुडू, पंत बाहेर   

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, स्मिथ-वॉर्नर परतले