ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, स्मिथ-वॉर्नर परतले

ICC World Cup 2019 सिडनी: आयसीसी वन डे विश्वचषकासाठी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. बॉल टॅम्परिंगमुळे वर्षभर संघाबाहेर राहिलेले डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांचा ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय संघात समावेश झाला आहे. पीटर हॅण्डस्कोम्ब आणि जोश हेजलवूड यांना स्थान देण्यात आलेलं नाही. एकदिवसीय विश्वचषकाला (ICC Cricket World Cup 2019)  30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत […]

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, स्मिथ-वॉर्नर परतले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

ICC World Cup 2019 सिडनी: आयसीसी वन डे विश्वचषकासाठी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. बॉल टॅम्परिंगमुळे वर्षभर संघाबाहेर राहिलेले डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांचा ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय संघात समावेश झाला आहे. पीटर हॅण्डस्कोम्ब आणि जोश हेजलवूड यांना स्थान देण्यात आलेलं नाही.

एकदिवसीय विश्वचषकाला (ICC Cricket World Cup 2019)  30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 1 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध आहे.

विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ –

अरॉन फिंच (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), नॅथन कुल्टर नाईल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झे रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्क्स स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

स्मिथ-वॉर्नरचं कमबॅक

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना ऑस्ट्रेलियन संघात पुन्हा स्थान दिलं आहे.  दोघांवरही बॉल टेम्परिंग प्रकरणात वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली होती. वर्षभर मैदानाबाहेर राहिल्यानंतर स्मिथ आणि वॉर्नर मैदानावर परतले आहेत. सध्या दोघेही भारतात सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये खेळत आहेत. आयपीएलमध्ये सध्या वॉर्नर सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वलस्थानी आहे. वॉर्नरने 7 सामन्यात 400 धावा ठोकल्या आहेत.

भारतीय संघाची आज घोषणा

दरम्यान वर्ल्डकपसाठी आज भारतीय संघाची घोषणा (Indian squad for Cricket World Cup 2019) करण्यात येत आहे. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत टीम इंडियावर शिक्कामोर्तब होईल.

संबंधित बातम्या 

ICC World Cup 2019 LIVE : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कोणाकोणाला स्थान?  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.