
नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या चार मॅचेस झाल्या आहेत. त्यापैकी तीन मॅचेस टीम इंडियाने जिंकल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंचं कौतुक होत आहे. पाकिस्तान टीमच्या (Pakistan) खेळाडूंनी आफ्रिका टीमच्या (SA) विरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. त्यांचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा रस्ता खडतर झाला आहे.
I’ll marry a Zimbabwean guy, if their team miraculously beats India in next match ?
— Sehar Shinwari (@SeharShinwari) November 3, 2022
पाकिस्तानच्या एका अभिनेत्रीने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. ती म्हणाली आहे की “जर झिम्बाब्वेच्या टीमने टीम इंडियाचा पराभव केल्यास मी झिम्बाब्वेच्या पुरुषाशी लग्न करेन” तेव्हापासून ती सोशल मीडियावर अधिक चर्चेत आहे.
I’ll marry a Zimbabwean guy, if their team miraculously beats India in next match ?
— Sehar Shinwari (@SeharShinwari) November 3, 2022
शिनवारी असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे, तिने काल सोशल मीडियावर ही पोस्ट लिहीली आहे. तिने लग्न करण्याचं आश्वासन दिल्यापासून ती अधिक चर्चेत आली आहे. तसेच अनेक चाहत्यांनी तिला कमेंट करुन अनेक प्रश्न विचारले आहेत.
टीम इंडियाने ज्यावेळी पाकिस्तानचा पहिल्या सामन्यात पराभव केला. तो पराभव पाकिस्तान चाहत्यांच्या अधिक जिव्हारी लागला आहे. तेव्हापासून पाकिस्तानच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.