
greatest middle order batsmen in ODI cricket history : इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन (Nasser Hussain) याने वनडे क्रिकेट इतिहासातील तीन दमदार खेळाडूची नावे जाहीर केली आहे. नासिरच्या मते, विराट कोहली, एबी डिविलियर्स (AB de Villiers) आणि जो रूट हे वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वात महान फलंदाज आहेत. स्काय स्पोर्ट्स सोबत बोलताना नासिरने मध्यला फळीतील फलंदाजांची नावे जाहीर केली. तो म्हणाला की, वनडे क्रिकेटच्या इतिहासात मध्यला फळीत खेळणारी केवळ दोनच खेळाडू झाले आहेत. एबी आणि कोहली. हे दोघे मधल्या गोलंदाजीत धावांचा डोंगर उभे करण्यात एकदम सक्षम आहेत. त्याने जो रूटवर पण कौतुकाचा वर्षाव केला. तो एक प्रतिभाशाली खेळाडू असल्याचे नासिर म्हणाला. गॅपमध्ये चेंडू टोलवण्यात जो एकदम एक्सपोर्ट असल्याचे नासिर म्हणाला. तो ज्या पद्धतीने खेळतो ते अद्भूत असल्याचे मत त्याने मांडले.
जो रूटने इंग्लंड विरोधात खेळल्या गेलेल्या वनडे सामाना मालिकेत कमालीची फलंदाजी केली. तीन सामान्यांमध्ये जो रूटने 133.50 या सरासरीने 267 धावा केल्या. त्याने एक शानदार शतक ठोकले. दुसर्या वनडेमध्ये रूटने 166 धावा चोपल्या. तर रूटने आतापर्यंत 180 सामन्यात एकूण 8134 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये त्याच्या 42 अर्धशतकांचा आणि 18 शतकांचा समावेश आहे. विराट कोहली हा कसोटी निवृत्त झाला आहे. आयपीएलमध्ये त्याने दमदार कामगिरी बजावली आहे.
टीम इंडियाची कसोटी लागणार
टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत, जे दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. ही कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीनेही महत्त्वाची असून, दोन्ही संघाना गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी या सामन्यांत चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन यांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यात कसोटी लागणार आहे. शुभमन गिल याला या दौऱ्यावर कमाल दाखवण्याची मोठी संधी मानण्यात येत आहे.