
क्रिकेट चाहते आता IPL 2025 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलचा 18वा सीझन येत्या 22 मार्चपासून खेळवला जाणार असून तो 25 मे पर्यंत सुरू राहणार आहे. आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये खेळाडू भरपूर कमाई करतात, त्यामुळे जगातील सर्व मोठे खेळाडू भारतात खेळण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत आगामी आयपीएल 2025 डोळ्यासमोर ठेवून 5 स्टार खेळाडूंनी मोठा निर्णय घेतला आहे. हे सर्व खेळाडू आयपीएल 2025 पूर्वी खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकेत आपल्या देशाच्या टीमसाठी खेळणार नाहीत.
5 स्टार खेळाडूंचा धक्कादायक निर्णय
आगामी आयपीएल स्पर्धेसाठी सर्व खेळाडू आपापल्या संघात सामील होण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या पाच स्टार खेळाडूंनी आयपीएल 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र आणि मिचेल सँटनर असे हे खेळाडू आहेत. आयपीएलमधील या पाच खेळाडूंच्या सहभागामुळे पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेवर परिणाम होणार आहे.
आयपीएलचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना केवळ प्रचंड पैसा मिळत नाही तर ते त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीला नवीन उंचीवर घेऊन जाते. हे खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत सहभागी होणार नाहीत, अशी माहिती आधीच देण्यात आली होती, कारण आयपीएलच्या तारखा आणि पाकिस्तानमध्ये होणारी मालिरा यांच्या तारखा एकाचवेळेस आहेत. याशिवाय खेळाडूंचे हित आणि मनोबल लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
IPL मध्ये या संघात सामील होणार खेळाडू
डेव्हॉन कॉनवे हाँ आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील होणार आहे. त्याच वेळी, रचिन रवींद्र देखील आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. लॉकी फर्ग्युसनबद्दल सांगायचे तर, यावेळी तो पंजाब किंग्ज संघाकडून खेळणार आहे. दुसरीकडे, मिचेल सँटनर मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. आणि ग्लेन फिलिप्स यावेळी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाकडून खेळणार आहे.