Tokyo Paralympics : यंदाची पॅरालिम्पिक स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी कमालीची भारी ठरत आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारतीय पॅरा एथलिट्स एका मागोमाग एक पदकं खिशात घालत आहेत. या कामगिरीमुळे देशभरातून भारतीय पॅरा एथलिट्सना प्रेम मिळत असून त्यांच कौतुकही होत आहे. नुकतेच भारताचे नेमबाजपटू मनीष नरवालने सुवर्ण पदक तर सिंहराजने रौप्यपदक पटकावले. त्यांनी पी 4 मिक्स्ड 50 मीटर पिस्तूल एसएस -1 फायनलमध्ये अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले. त्यांच्या या कामगिरीचा हरयाणा सरकारने सन्मान करत त्यांना बक्षिस जाहीर केले आहे. त्यांनी मनीषला 6 कोटी तर सिंहराजला 4 कोटींचं बक्षिस जाहीर केलं आहे.
क्वालिफिकेशनमध्ये सिंहराज 536 गुणांसह चौथ्या स्थानावर होता, तर मनीष नरवाल (533) सातव्या स्थानावर होता. मनीष नरवालने फायनलमध्ये 218.2 गुणांसह प्रथम स्थान मिळवलं. तर सिंहराज (216.7) दुसऱ्या स्थानावर दुसऱ्या स्थानावर राहिला. मनीष नरवालने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला तिसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. यापूर्वी अवनी लाखेरा (महिला 10 मीटर एअर रायफल SH1) आणि सुमित अँटिल (पुरुष भाला फेक F64) यांनी सुवर्णपदके जिंकली.
#TokyoParalympics | Haryana government under @mlkhattar announces a reward of Rs 6 crores for gold medalist Manish Narwal and Rs 4 Crores for silver medal winner Singhraj Adhana in Shooting P4 Mixed 50m Pistol SH1. We would like to see a day when we honour 100 Olympians
— Raman Malik🇮🇳 (@ramanmalik) September 4, 2021
39 वर्षीय सिंहराजला या पॅरालिम्पिकमध्ये दुसरे पदक मिळाले. यापूर्वी त्याने 10 मीटर एअर पिस्तूल SH1 मध्ये कांस्यपदक जिंकले होते. अवनी लाखेराकडेही दोन पदके आहेत. सुवर्ण व्यतिरिक्त त्याने कांस्य जिंकले आहे.
(haryana government will Reward rs 6 crores to manish Narwal and Singhraj for winning gold and Silver medal)