Tokyo Paralympics 2020 : उद्घाटन समारंभात आतषबाजीने लावले चारचाँद, पाहा दिमाखदार सोहळ्याचे PHOTO

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 24, 2021 | 6:58 PM

ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आजपासून पॅरालिम्पिक्स खेळांना टोक्योमध्येच सुरुवात झाली आहे. दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी झालेल्या कार्यक्रमातील आतषबाजी अत्यंत नयनरम्य होती.

Aug 24, 2021 | 6:58 PM
कोरोनाच्या संकटामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics) अखेर यावर्षी पार पडल्या. त्यानंतर आता पॅरालिम्पिक्स खेळांचं (Tokyo Paralympics 2020) आयोजन  करण्यात आलं आज (24 ऑगस्ट) स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला.

1 / 5
या कार्यक्रमात अनेक मनोरंजनाचे आणि लक्षवेधी कार्यक्रम झाले. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच झालेली आतषबाजीला मात्र काहीच तोड नव्हता. भव्य अशा या आतषबाजीने सर्वांचेच लक्ष वेधले असून सोशल मीडियावरही याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याने उद्घाटन समारंभा दरम्यान कोरोनासंबधी सर्व नियम पाळण्यात आले आहेत. सर्व देशांचे खेळाडू आणि अधिकारी मास्कसह घालण्यासह इतर काळजी घेताना दिसून आले.

3 / 5
या भव्य अशा उद्घाटन समारंभाला भारताकडून ध्वजवाहक म्हणून शॉटपुट खेळाडू टेक चंद तिरंगा घेऊन मैदानात आला. त्याच्या मागे भारताचे अधिकारी आणि खेळाडू मिळून 8 सदस्य होते.

4 / 5
उद्घाटन समारंभावेळीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोत मॉरीशस संघाचा पायाने अपंग असलेल्या खेळाडूने त्याचा कृत्रिम पाय देशाच्या झेंड्याने रंगवला आहे. या फोटोला नेटकरी मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI