नीरज चोप्राला त्याच्या जीवनावर बायोपिक नको, सांगितलं त्यामागील कारण, कारण ऐकून चाहतेही कोड्यात

टोक्यो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास रचलेल्या नीरज चोप्राचं देशभरात कौतुक होत आहे. अशात त्याच्या जीवनावर चित्रपट तयार करण्यासाठी अनेकजण उत्सुक असताना त्याने स्वत:वरील बायोपिक करण्याबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

नीरज चोप्राला त्याच्या जीवनावर बायोपिक नको, सांगितलं त्यामागील कारण, कारण ऐकून चाहतेही कोड्यात
नीरज चोप्रा
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 10:48 AM

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) मिळवलेल्या घवघवीत यशानंतर त्याच्या जीवनावर एक बायोपिक बनवण्याची चर्चा सुरु आहे. चाहते देखील अभिनेता कोण घ्यावा यासाठी ट्विटरवर आपल्या आवडी-निवजी जाहीर करत आहेत. प्रत्येकालाच नीरजची प्रेरणादायी गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहायची आहे. पण मूळात नीरज याबद्दल काय विचार करतो हेही तितकचं महत्त्वाचं आहे.

बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर फरहान अक्ख्तरने त्यांची भूमिका साकारत पहिला खेळाडूवरील बायोपिक केला. त्यानंतर अलीकडे अशाप्रकारे बायोपिक येण्याची फॅशनच आली आहे. यात मेरी कोम, सायना नेहवाल, एम एस धोनी अशा अनेकांच्या जीवनावर चित्रपट आले असून काही जणांच्या जीवनावर चित्रपट येणार देखील आहेत. त्यामुळेच नीरजच्या जीवनावरही चित्रपट काढावा अशी मागणी चाहते करत आहेत.

बायोपिक करण्यावर नीरजचं मत

नीरजला तूर्तास तरी त्याच्या जीवनावर कोणताही चित्रपट बनू नये असं वाटतं. बायोपिकबद्दल त्याला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘मला बायोपिकबाबत जास्त  काही माहित नाही. मी सध्यातरी माझ्या खेळावर लक्ष देऊ इच्छितो. जेव्हा खेळणं सोडून देईल. तोवर आणखी गोष्टी घडलेल्या असतील, अशावेळी माझ्या जीवनावर चित्रपट बनवला डाऊ शकतो. पण सध्यातरी मला फक्त माझ्या खेळावर लक्ष द्यायचं आहे.’ नीरज पुढे म्हणाला, ‘माझ्या मते तरी कोणत्याच सध्या खेळत असलेल्या खेळाडूवर चित्रपट तयार करण योग्य नाही. निवृत्तीनंतर हे सर्व ठिक आहे.’

नीरज चोप्राने सांगितलं कोण असावा हिरो

तूर्तास तरी आपल्या जीवनावर बायोपिक करण्यात येऊ नये असं सांगणाऱ्या नीरजने पूर्वीच्या एका मुलाखतीत मात्र वेगळच उत्तर दिलं होतं. ‘कधी भालाफेक स्पर्धेवर बायोपिक तयार करण्यात आला तर तुला तुझ्याजागी कोणत्या अभिनेत्याला पाहायला आवडेल? असा प्रश्न नीरजला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्याने ‘असे झाल्यास चांगलेच होईल आणि मला हरियाणाचा असणारा रणदीप हुड्डा खूप आवडतो. तसेच अक्षय कुमारही आवडतो.’ असं उत्तर दिलं होतं. विशेष म्हणजे या दोघांनी नीरजला सुवर्णपदक विजयानंतर खास शुभेच्छा दिल्या होत्या.

इतर बातम्या

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

(Tokyo olympic gold medal winner Neeraj have not thought about his biopic yet says there are more things to come in my story)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.