वैभव सूर्यवंशीचा पराक्रम! गुजरातविरुद्ध ठोकले खास ‘शतक’, नावावर केला मोठा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’
मोहम्मद सिराजविरुद्ध पहिल्याच चेंडूवर खेळताना वैभव सूर्यवंशीने षटकार मारून विश्वविक्रम प्रस्थापित केला. मात्र, राजस्थान रॉयल्स हा सामना ७७ धावांच्या मोठ्या फरकाने हरला.

सध्या सर्वत्र आयपीएलची क्रेझ पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी आयपीएलचे स्क्रीन सुरु आहे. राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने शनिवारी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचला आहे. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर षटकार खेचून वैभवने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या १०० षटकारांचा टप्पा गाठला आणि एका अनोख्या जागतिक विक्रमाला गवसणी घातली.
पहिल्याच चेंडूवर षटकार आणि वर्ल्ड रेकॉर्ड
मोहम्मद सिराजने टाकलेल्या पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून वैभवने टी-२० क्रिकेटमधील आपले १०० षटकार पूर्ण केले. विशेष म्हणजे, वैभव हा टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वात जलद १०० षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने केवळ ५१४ चेंडूंमध्ये हा पल्ला गाठला.
या शर्यतीत त्याने जगातील दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे:
वैभव सूर्यवंशी: ५१४ चेंडू (नवा विक्रम)
करणबीर सिंह (ऑस्ट्रेलिया): ८१३ चेंडू
कीरोन पोलार्ड (वेस्ट इंडिज): ८४३ चेंडू
राजस्थानचा ७७ धावांनी मोठा पराभव
रियान परागच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वालने राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. नाणेफेक जिंकून यशस्वीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने साई सुदर्शन (५५ धावा) आणि शुभमन गिल (८४ धावा) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर २२९ धावांचा डोंगर उभा केला.
विजयासाठी २३० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात वेगवान झाली. वैभवने १६ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. मात्र, वैभव बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव गडगडला. कर्णधार यशस्वी जयस्वाल केवळ ३ धावा करून बाद झाला. संपूर्ण संघ १५२ धावांवर गारद झाला आणि गुजरातने हा सामना ७७ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
Straight away into attack mode!
Vaibhav Sooryavanshi wastes no time and dispatches his first delivery into the crowd🚀
And that was his 100th T20 six!🔥#TATAIPL Revenge Week 2026 ➡️ #RRvGT | LIVE NOW 👉 https://t.co/4f0xDg7EfO pic.twitter.com/cac9MSLgIo
— Star Sports (@StarSportsIndia) May 9, 2026
सिराज आणि वैभव यांच्यातील ‘हाय-व्होल्टेज’ लढत
सामन्याच्या सुरुवातीलाच वैभव आणि मोहम्मद सिराज यांच्यात चुरस पाहायला मिळाली. डावाच्या पहिल्या ओव्हरमध्ये वैभवने सिराजला चांगलेच झोडले. षटकार मारले. मात्र, पुढच्याच चेंडूवर सिराजने टाकलेल्या भेदक यॉर्करमुळे वैभवला दुखापत झाली.
सिराजने टाकलेल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये वैभवने तीन चौकार मारले होते, पण पाचव्या चेंडूवर सिराजने वेगवान बाउन्सर टाकला. या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात वैभवचा झेल अर्शद खानने पकडला. वैभवची विकेट घेतल्यावर सिराजने ज्या पद्धतीने जल्लोष केला, त्यावरून हे स्पष्ट झाले की ही विकेट गुजरातसाठी किती महत्त्वाची होती.