VIDEO : बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करणाऱ्या आजीचा व्हिडीओ व्हायरल

आज देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी बुमराहचा फॅन आहे. मग तो लहान मुलगा असो किंवा उतरत्या वयातील कुणी वृद्ध. ट्विटरवर सध्या अशाच एका आजीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. यामध्ये या आजी बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसत आहे.

VIDEO : बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करणाऱ्या आजीचा व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Jul 14, 2019 | 7:31 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा यॉर्करमॅन जसप्रित बुमराह याच्या गोलंदाजीचे तर सर्वच फॅन आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जसप्रित बुमराह समोर आला. खेळाच्या कुठल्याही परिस्थितीत विकेट घेण्याची क्षमता जसप्रित बुमराहमध्ये आहे. जगातील टॉप रँकिंग गोलंदाजांच्या पंगतीत त्याने आपलं स्थान निर्माण केलं आहे.


आज देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी बुमराहचा फॅन आहे. मग तो लहान मुलगा असो किंवा उतरत्या वयातील कुणी वृद्ध. ट्विटरवर सध्या अशाच एका आजीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. यामध्ये या आजी बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसत आहे. ट्विटरवर शनिवारी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला.

“इतरांप्रमाणे आमची आईदेखील विश्वचषकातील बुमराहच्या प्रदर्शनाने इतकी प्रभावित झाल्या, की त्यांनी बुमराहच्या रन-अपची नक्कल करण्याचा निर्णय घेतला”, असं या ट्विटर युझरने लिहिलं.

हा व्हिडीओ शांता सक्कुबाई नावाच्या ट्विटर युझरने शेयर केला. व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला जसप्रित बुमराहच्या गोलंदाजीची नकक्ल करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर बुमराहनेही हा व्हिडीओला त्याच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला. ‘याने माझा दिवस आणखी खास बनवला’, असं बुमराहने ट्वीट करताना लिहिले.

बुमराहने आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याने नऊ सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या.