Rohit Sharma : “T20 विश्वचषकापूर्वी सुर्याचा फॉर्म चिंतेचा विषय”, रोहित शर्मा मोठ्याने हसला

आज रोहित शर्माचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सुर्यकुमार यादवच्या फॉर्मबाबत विचारण्यात आलं आहे.

Rohit Sharma : T20 विश्वचषकापूर्वी सुर्याचा फॉर्म चिंतेचा विषय, रोहित शर्मा मोठ्याने हसला
ROHIT SHARMA
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 05, 2022 | 1:01 PM

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार त्याच्या खेळी बरोबर इतर गोष्टींसाठी अधिक प्रसिद्ध आहे. मागच्या काही दिवसांपासून तो अधिक चर्चेत आला आहे. कारण टीम इंडियाने आशिया चषकात (Asia Cup 2022) खराब कामगिरी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर पुन्हा रोहित शर्माची (Rohit sharma) चर्चा सुरु झाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहितने चांगली कामगिरी केल्यामुळे त्याचं कौतुक झालं. विशेष म्हणजे रोहित शर्मा नेहमी हास्यास्पद बोलण्यात एकदम पटाईत आहे. त्यामुळे त्याचे व्हिडीओ अधिक व्हायरल होतात.

आज रोहित शर्माचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सुर्यकुमार यादवच्या फॉर्मबाबत विचारण्यात आलं आहे. त्यावर तो
T20 विश्वचषकापूर्वी सुर्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे असं म्हणाला आहे. त्यानंतर तो मोठ्याने हसला सुद्धा आहे.

आशिया चषकापासून सुर्यकुमार यादव अधिक चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचा फॉर्मबाबत काल अचानक टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज मुरलीने प्रश्न विचारला होता.