मुख्यमंत्र्यांकडून दसरा मेळाव्याचा नवा टीझर जारी करत जनतेला शुभेच्छा

दसरा मेळाव्याच्या अवघ्या काही तास आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दसरा मेळाव्याचा आपला नवा टीझर जारी केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दसरा मेळाव्याचा नवा टीझर जारी करत जनतेला शुभेच्छा
Image Credit source: tv9 marathi
अजय देशपांडे

|

Oct 05, 2022 | 12:52 PM

मुंबई : आज मुंबईत (Mumbai) दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. बीकेसीमध्ये (BKC) शिंदे गटाचा तर शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आमच्याच दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी असेल असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. दसरा मेळाव्याच्या अवघ्या काही तास आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत दसरा मेळाव्याचा आपला नवा टीझर जारी केला आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्याचे अनेक टीझर जारी केले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा एक नवा टीझर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जारी केला आहे. निर्णय विकासाचा, निर्णय हिंदुत्वाचा, निर्णय मराठी अभिमानाचा दसरा मेळावा स्वाभिमानाचा म्हणत हा टीझर जारी करण्यात आला आहे.

दसऱ्याच्या शुभेच्छा

दरम्यान हा टीझर जारी करताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्हि़डीओला कॅप्शन देखील दिले आहे. ‘ही वेळ आहे अनेक नव्या संकल्पांसह सीमोल्लंघनाची, हिंदूत्व आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, राज्यातील माय-बाप जनतेच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी मा. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आपण सगळे जमणार आहोत बीकेसी मैदानावर. सर्वांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा’.  असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईत दाखल

दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आता दसरा मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. या दसरा मेळाव्यांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आणि शिवसेनेने कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल झाले आहेत. दोन्ही गटाकडून दसरा मेळावा भव्य- दिव्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें