AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा ट्विस्ट! खरोखरच अर्जुन तेंडुलकर आणि सानियाचा साखरपुडा झाला? दोन व्हायरल फोटो काय सांगतात?

सध्या सगळीकडे सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरची चर्चा सुरु आहे. अर्जुनने सानिया चंडोकशी गुपचूप साखरपुडा केला. सोशल मीडियावर आता काही फोटो व्हायरल होत आहेत. पण या फोटोमागचे सत्य काय जाणून घ्या...

मोठा ट्विस्ट! खरोखरच अर्जुन तेंडुलकर आणि सानियाचा साखरपुडा झाला? दोन व्हायरल फोटो काय सांगतात?
Arjun tendulkarImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 15, 2025 | 4:29 PM
Share

क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने सानिया चंडोकसोबत साखरपुडा केला आहे. मीडिया अहवालांनुसार, हा समारंभ कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. सानिया ही मुंबईतील पेट न्यूट्रिशन आणि वेलफेअर फर्म ‘मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपी’मध्ये पार्टनर आणि डायरेक्टर आहे. ती मुंबईतील मोठे उद्योगपती रवी घई यांची नात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. पण या फोटोंमागील सत्य काही वेगळेच आहे.

अर्जुन-सानियाचे फोटो व्हायरल

सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हे जोडपे एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहे. अर्जुनने काळ्या रंगाचा सूट घातला आहे तर सानियाने लालसर रंगाचा वन पिस घातला आहे. दुसऱ्या एका फोटोत सानिया आणि अर्जुन हातात हात घालून उभे आहेत. अर्जुनने गदर निळ्या रंगाची प्लेन शेरवानी घातली आहे तर सानियाने फिकट गुलाबी रंगाचा घागरा घातल्याचे दिसत आहे. दोघेही अतिशय क्यूट दिसत आहेत. त्यांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल आहे. पण खरे तर हे सर्व बनावट आहे.

वाचा: महिला पाय क्रॉस करून का बसतात? फक्त स्टाइल की आहे खास कारण? जाणून घ्या…

एआयच्या मदतीने बनवलेले फोटो

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या मदतीने तयार केले आहेत. आजकाल सोशल मीडियावर एआयच्या मदतीने विविध प्रकारचे फोटो बनवून व्हायरल केले जात आहेत. असेच काही वापरकर्त्यांनी अर्जुन आणि सानियाचे फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले. पण प्रत्यक्षात हे फोटो पूर्णपणे फेक आहेत.

मोठ्या कुटुंबाशी संबंध

रवी घई हे ग्राव्हिस ग्रुपचे चेअरमन आहेत. ग्राव्हिस ग्रुप हॉस्पिटॅलिटी आणि फूड-अँड-बेव्हरेज उद्योगात एक मोठे नाव आहे. अर्जुन आणि सानिया दोघेही मुंबईतील आहेत. सानियाची अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरसोबतही चांगली मैत्री आहे. सारा तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचे काही फोटोही समोर आले आहेत. या फोटोंमध्ये सारा आणि सानिया जयपूरमध्ये एकत्र फिरताना आणि आयपीएल सामना पाहताना दिसत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.