
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमने आयपीएल 2025 ट्रॉफी जिंकून नवीन इतिहास रचला आहे. आयपीएल ट्रॉफी जिंकणारी आरसीबी आठवी टीम ठरली. त्यासाठी त्यांना 17 वर्ष प्रतिक्षा करावी लागली. या विजयानंतर आरसीबीचा प्रत्येक खेळाडू विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये बुडून गेला होता. खेळाडूंनी मैदानावर जोरदार सेलिब्रेट केलं. ग्राऊंडला फेरी मारुन फॅन्सना अभिवादन केलं. या दरम्यान विराट कोहलीने एका मुलीला आयपीएल ट्रॉफीला स्पर्श करु दिला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आरसीबीच्या विजयानंतरचा एक क्षण सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होतोय. विराट कोहलीने स्पोर्ट्स अँकर मयंती लँगरला आयपीएल ट्रॉफीला स्पर्श करु दिला. हा क्षण केवळ मयंती नाही, तर आरसीबी फॅन्ससाठी सुद्धा संस्मरणीय ठरला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फॅन्सनी सोशल मीडियावर विराटच खूप कौतुक केलं. मयंती नावाजलेली स्पोर्ट्स अँकर आहे. तिचा बंगळुरुशी संबंध आहे. ती त्यावेळी स्टेडिअममध्ये उपस्थित होती. तिचा नवरा स्टुअर्ट बिन्नी 2016 साली आरसीबी टीमचा भाग होता. त्यावेळी फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून पराभव झालेला.
मी बंगळुरुची मुलगी आहे
ज्यावेळी विराटने मयंतीला ट्रॉफीला स्पर्श करण्याची संधी दिली, त्यावेळी तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. “माझा नवरा 2016 साली आरसीबीकडून खेळला होता. त्या फायनलमध्ये आम्ही हरलो होतो. मी बंगळुरुची मुलगी आहे. ज्यावेळी विराट कोहलीने मला आयपीएल ट्रॉफीला स्पर्श करु दिला, अजूनही मला यावर विश्वास बसत नाहीय. तिची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे”
Here’s the video. Look at the way Mayanti gently touches Kohli’s cheeks man he’s so so loved by everyone 😭🫶 pic.twitter.com/4lyW2DXEgg https://t.co/7WKrrivIRd
— H. 🇮🇹 (@cmoncheeeeks) June 3, 2025
त्यामुळे हा विजय त्याच्यासाठी खास
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम पहिल्या सीजनपासून आयपीएलचा भाग आहे. याआधी ते चॅम्पियन बनू शकले नाहीत. याआधी तीनवेळा ते फायनलमध्ये पोहोचले. पण प्रत्येकवेळी आरसीबीची पराभव झाला होता. विराट कोहली एकमेव खेळाडू आहे, जो पहिल्या सीजनपासून एकाच टीमसाठी खेळतोय. त्यामुळे हा विजय त्याच्यासाठी खास आहे.