Virat Kohli: माझं नुकसान झालं तरीही चालेल पण आता नकोच….विराट कोहलीने अशी प्रतिक्रिया काय दिली?

कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला कोहली आता फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळतो. त्याने आता नुकतेच त्याच्या One8 ब्रँडचे शूज लाँच केले. या क्रार्यक्रमादरम्यान आता त्याने कसोटी क्रिकेटवर एक विधान केले आहे.

Virat Kohli: माझं नुकसान झालं तरीही चालेल पण आता नकोच....विराट कोहलीने अशी प्रतिक्रिया काय दिली?
virat kohli on his test cricket return
| Updated on: Jun 22, 2026 | 10:29 AM

गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला कोहली आता फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळतो. कोहली सध्या फक्त एकदिवसीय सामने खेळतो. मात्र, दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळू शकला नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी काल निवडलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे, परंतु फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यावरच तो संघात सामील होई आणि खेळू शकतो. कोहलीचे लक्ष 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्यावर आहे आणि ते साध्य करण्यासाठी तो कठोर परिश्रम घेत आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 9,230 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याने आपल्या नवीन शूजची किंमत त्याच्या कसोटी धावांच्या बरोबरीने ठेवली आहे. यावरुन आता त्याला त्याच्या वन८ ग्लोबलच्या एका प्रीमियर कार्यक्रमात कसोटी क्रिकेटबद्दल एक प्रश्न विचारला ज्याचे उत्तर त्याने दिले. पण त्या उत्तराची आता सर्वाधिक चर्चा होत आहे.

तू कसोटी क्रिकेटमध्ये जितक्या धावा केल्या आहेत तितकीच तुझ्या ब्रँडच्या शूजची किमत आहे. तर शूजची किमत वाढवण्यासाठी तू कसोटी क्रिकेटमध्ये परतशील का? असे विचारले असता, विराट कोहलीने गंमतीने सांगितले की, “माझे नुकसान झाले तरी चालेल पण कसोटी क्रिकेटमध्ये परतणार नाही.”

विराटच्या या उत्तराने प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले पाहायला मिळाले. संभाषणादरम्यान, कोहलीने आपल्या ‘हार न मानण्याच्या’ वृत्तीबद्दलही सांगितले, जी त्याने नेहमीच जपली आहे. आपला मुद्दा स्पष्ट करताना, त्याने 2022 च्या टी20 विश्वचषकादरम्यान मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या आपल्या अविस्मरणीय सामना-विजयी खेळीचा दाखला दिला. “मी तसाच आहे. मला अशा परिस्थिती आवडतात, जिथे लोकांना वाटते की सामना तुमच्या हातातून निसटला आहे, आणि मग तुम्ही तो सामना कसातरी पुन्हा तुमच्या बाजूने वळवता,” असे कोहली म्हणाला.

कोहली म्हणाला की, “मी अगदी लहानपणापासूनच परिस्थितीकडे याच दृष्टिकोनातून पाहतो. आणि अगदी शेवटपर्यंत, आपण सामना हरलो आहोत किंवा जिंकू शकत नाही, यावर माझा कधीच विश्वास बसला नाही. आणि त्यामुळेच अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवता आले. माझ्यासाठी नेहमीच लक्षात राहणारी घटना म्हणजे मेलबर्नमधील पाकिस्तानविरुद्धचा सामना. सामन्यानंतर मला सांगण्यात आले की, त्यावेळी आमच्या जिंकण्याची शक्यता केवळ तीन टक्के होती. पण मी त्याकडे कधीच तसे पाहिले नाही. एक टक्का शक्यतासुद्धा पुरेशी आहे. संधी असेल, तर ती असतेच. जोपर्यंत सामना प्रत्यक्षात हारत नाही, तोपर्यंत तो संपलेला नसतो.”

Follow Us