
मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्यानंतर न्यूझिलंड (NZ) दौऱ्यासाठी त्याच्यासह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे विराट कोहली सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. काल विराट कोहलीने एक कलरफुल टी-शर्ट घातल्यामुळे तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आला होता. त्याच्या आगोदर तो चाहत्यांना उत्तराखंड राज्यात दिसला होता.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये विराट कोहली भाडी घासत आहे, तर अनुष्का शर्मा विराटच्या बाजूला उभी राहून हसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून चाहत्यांनी त्यावर कमेंट करुन अनेक प्रश्न विचारले आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे यांच्या आगोदर सुद्धा असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्याचा विराटचा व्हायरल झालेला फोटो उत्तराखंड राज्यातला असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. विशेष म्हणजे हा फोटो चाहत्यांना अधिक आवडल्यामुळे व्हायरल झाला आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी जुहू बीचजवळ एक भाड्याने घर घेतलं आहे. त्याचं भाडे आणि डिपॉझिट याची सुद्धा चर्चा सोशल मीडियावर होती. त्या घरातून समुद्र दिसत असल्यामुळे त्यांनी ते घर भाड्याने घेतलं आहे.