
वीरेंद्र सेहवागची क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री खूप आधी झाली होती. मात्र अधिकृतरीत्या म्हणजेच भारतीय जर्सीसह सेहवागने १९९९ मध्ये वनडे आणि २००१ मध्ये कसोटी दरम्यान पदार्पण केले. सेहवागची आक्रमक फलंदाजी शैली, तसेच २००९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धची सर्वात जलद १०० धावांची खेळी आणि अनेक ऐतिहासिक खेळींसाठी सेहवागची वेळोवेळी आठवण येते.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सेहवाग हा कसोटीत त्रिशतक आणि वनडेत द्विशतक झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. ३० ऑक्टोबर २०१५ मध्ये सेहवागने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतरही सेहवाग दरमहिन्याला लाखो रुपये कमावतो. जाणून घेऊया त्याची नेटवर्थ आणि त्याचा लाखो रुपये कमवण्याचं सोर्स कोणते आहेत.
सेहवागने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्याकडे उत्पन्नाचे इतरही अनेक स्त्रोत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार सेहवागची एकूण संपत्ती अंदाजे 42 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 350 कोटी रुपये आहे. त्याची कमाई प्रामुख्याने जाहिराती, कॉमेंट्री आणि हरयाणातील त्याच्या क्रिकेट स्कूलमधून होते.
शिवाय सेहवागची टीव्ही शोजमधूनही कमाई होत असते. याशिवाय सेहवाग सोशल मीडिया आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही भरपूर पैसे कमावतो. सेहवाग इंस्टाग्राम, एक्स आणि यूट्यूबसारख्या मोठ्या सोशल मीडिया साइट्सवरून वर्षाला सुमारे 2.6 अब्ज रुपये कमावतो. मात्र टीव्ही ९ मराठीने याला दुजोरा दिलेला नाही.
वीरेंद्र सेहवागचं घर दिल्ली येथील एका पॉश ठिकाणी असून त्याचा आलिशान बांगला बंगला हौजखासमध्ये ‘कृष्णा निवास’ नावाने प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी सेहवाग आपल्या कुटुंबासोबत नजफगढ़ शिफ्ट झाले होते. त्यांच्या घराची किंमत 130 कोटींच्या आसपास आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे बेंटले आणि बीएमडब्ल्यू 5 सीरिज सारख्या लिमिटेड एडिशन असलेल्या लक्झरी कार देखील आहेत. सेहवागचे कार कलेक्शन एकूण 7 कोटींच्या घरात आहे.
सेहवागच्या सर्व व्यवसायांव्यतिरिक्त कमाईचा मोठा हिस्सा हरयाणातील त्याच्या शाळेतूनही येतो. त्याने सेहवाग इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली आहे जिथे शिक्षण आणि खेळ या दोन्हींवर लक्ष केंद्रित केले जाते. सेहवागच्या त्रिशतकाच्या विक्रमानंतर हरयाणा सरकारने भेट म्हणून दिलेल्या २३ एकर जागेवर ही शाळा बांधण्यात आली आहे.