IND vs ZIM: याला म्हणतात कोच, म्हणून टीम इंडियाने मालिका जिंकली, जे लक्ष्मणला कळलं ते गंभीरला समजलचं नाही
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाने कमबॅक केला आणि मालिका जिंकली. या मालिका जिंकण्यामागे व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा एक दृष्टिकोन होता ज्यामुळे ते शक्य झाले.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका पार पडली जी भारतीय संघाने एकतर्फी जिंकली. या मालिकेत भारतीय संघावर विशेष लक्ष होते कारण मागील दोन मालिका गमावल्या होत्या. आता या मालिकेतून अखेर संघाने कमबॅक केला आहे. श्रेयस अय्यरलाही त्याच्या नेतृत्त्वात टी-20 मालिका जिंकण्याचे यश मिळाले. आता या मालिका जिंकण्यामागे कोच व्हीव्ही एस लक्ष्मणला क्रेडिट जाते. या मालिकेत संघाचा कोच बदलला आणि संघाला थेट विजयाची चव चाखायला मिळाली. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणपदाखाली भारतीय संघाला मागील दोन मालिका गमावणं भारी पडलं. अनेक टीकेचा सामना करावा लागला. जे काम गौतम गंभीर यांनी जमलं नाही ते काम आता व्हीव्ही एस लक्षम्ण यांनी करुन दाखवलं आहे.
भारताचे हंगामी मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा विश्वास आहे की, “वैभव सूर्यवंशीने आपली पूर्ण क्षमता गाठण्यासाठी आणि आपला खेळ पुढील स्तरावर नेण्यासाठी आपली तंदुरुस्ती सुधारत राहणे आवश्यक आहे.” रविवारी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध भारताच्या 35 धावांच्या विजयात सूर्यवंशीने 49 चेंडूंमध्ये शानदार 81 धावा केल्या. त्याच्या सामना जिंकवून देणाऱ्या खेळीमुळे तो तीन सामन्यांत 151 धावांसह मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आणि त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला ‘मालिकावीर’ पुरस्कार मिळाला. सूर्यवंशी फक्त 15 वर्षांचा आहे आणि त्याने इतक्या लहान वयातच आपल्या फलंदाजीतील कौशल्य सिद्ध केले आहे. त्याला भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जाते.
आतापर्यंत सूर्यवंशीच्या फलंदाजीने क्रिकेट जग प्रभावित झाले असले तरी, लक्ष्मण यांनी एका गोष्टीकडे लक्ष वेधले आहे, ज्यावर या युवा खेळाडूला आपली प्रगती सुरू ठेवायची असेल तर काम करण्याची गरज आहे. लक्ष्मण म्हणाले, “त्याने आपल्या फिटनेसवर लक्ष द्यावे अशी आमची इच्छा आहे. वैभव खूप तरुण आहे. त्याला आपल्या खेळाच्या प्रत्येक पैलूमध्ये सुधारणा करायची आहे. आजही, जेव्हा तो जखमी झाला (डीप स्क्वेअर लेगवरून धावताना आणि झेप घेऊन झेल घेण्याचा प्रयत्न करताना), तेव्हाही त्याला मैदानावरच राहायचे होते. फिजिओने त्याला बाहेर यायला सांगितले. संघासाठी शक्य त्या प्रत्येक मार्गाने योगदान देण्याचा हाच उत्साह आणि आवड त्याच्यात आहे.”