IND vs ENG : दुसरी मॅच तर हरलो पण त्यापेक्षा वाईट म्हणजे पहिली वनडे जिंकवून देणारा स्टार खेळाडू सीरीजमधून OUT

IND vs ENG : टीम इंडियाचा इंग्लंड दौऱ्यात संघर्ष सुरु आहे. आधी आयर्लंड त्यानंतर इंग्लंडकडून टी20 सीरीज हरलो. आता इंग्लंड विरुद्ध वनडे सीरीज 1-1 बरोबरीत आहे. पहिली वनडे जिंकलो पण दुसऱ्या सामन्यात पराभव झाला.

IND vs ENG : दुसरी मॅच तर हरलो पण त्यापेक्षा वाईट म्हणजे पहिली वनडे जिंकवून देणारा स्टार खेळाडू सीरीजमधून OUT
Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 17, 2026 | 8:38 AM

टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा संघर्षपूर्ण ठरतोय. आधी टी20 मालिकेत दारुण पराभव झाला. त्यानंतर वनडे सीरीजच्या पहिल्या सामन्यात विजय मिळाला. पण आता दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. वनडे सीरीजमध्ये फक्त निकालच नाही, तर खेळाडूंच्या फिटनेसने सुद्धा डोकेदुखी वाढवली आहे. टी20 सीरीज सुरु असताना हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती बाहेर गेले. त्यानंतर पहिल्या वनडेत शुबमन गिल रिटायर हर्ट झाला. आता दुसऱ्या वनडे सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झालीय. त्यामुळे लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात खेळू शकणार नाहीय. याच वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाला पहिला वनडे सामना जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

कार्डिफमध्ये गुरुवारी 16 जुलैला भारत-इंग्लंडमध्ये वनडे सीरीजमधला दुसरा सामना झाला. यावेळी फलंदाजी करताना डावखुऱ्या वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. विराट कोहली बाद झाल्यानंतर सुंदर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो फक्त चार चेंडूच खेळला, त्यानंतर पळत असताना वॉशिंग्टन सुंदरच्या पायाला दुखापत झाली. टीम इंडियाचे फिजियो मैदानात उतरले व त्यांनी सुंदरच्या पायाला पट्टी बांधली.

गोलंदाजी केली असती तर नक्कीच फरक दिसून आला असता

पण त्याचा फायदा झाला नाही. त्रास जास्त होत होता. त्याचा परिणाम सुंदरवर दिसला. पुढच्याच चेंडूवर पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात त्याने विकेटकिपरकडे सोपा झेल दिला. अवघे पाच चेंडू खेळून सुंदरने पॅवेलियनची वाट धरली. सुंदर त्यानंतर पुन्हा मैदानात उतरला नाही. फिल्डिंग, गोलंदाजी त्याने केली नाही. त्याने गोलंदाजी केली असती तर नक्कीच फरक दिसून आला असता.

टीम इंडियाला विजय मिळवून दिलेला

आता PTI रिपोर्टमधून सुंदरच्या दुखापतीबद्दल खुलासा झाला आहे. सुंदरची दुखापत गंभीर असून लॉर्ड्समध्ये 19 जुलैला होणाऱ्या शेवटच्या वनडे सामन्यात तो टीमचा भाग नसेल. म्हणजे तो सीरीजमधून बाहेर गेला आहे. त्याला पुनरागमनासाठी वेळ लागू शकतो. सुंदरची दुखापत टीम इंडियासाठी झटका आहे. कारण पहिल्या सामन्यात अक्षर पटेल सोबत मिळून त्याने नाबाद शतकी भागीदारी केली होती. शानदार अर्धशतक झळकवून टीम इंडियाला विजय मिळवून दिलेला.

Follow Us