BCCI : सिलेक्शन कमिटीचा अध्यक्ष बनण्यासाठी वसीम जाफर जास्त योग्य पण त्यांच्याऐवजी या माणसाला बनवलं जाऊ शकतं अध्यक्ष

BCCI : बीसीसीआयच्या निवड समिती अध्यक्षपदाची शर्यत इंटरेस्टिंग बनली आहे. मुंबईकर वसीम जाफर यांनी सुद्धा सिलेक्शन कमिटीच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज केला आहे. अजित आगरकर यांच्यानंतर त्या पदासाठी जाफर जास्त योग्य आहेत.

BCCI : सिलेक्शन कमिटीचा अध्यक्ष बनण्यासाठी वसीम जाफर जास्त योग्य पण त्यांच्याऐवजी या माणसाला बनवलं जाऊ शकतं अध्यक्ष
Wasim Jaffer
| Updated on: Oct 17, 2026 | 10:47 AM

टीम इंडियाचा नवीन चीफ सिलेक्टर कोण होणार? याची उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे. अजित आगरकर यांच्यानंतर या पदावर कोण बसणार?. चीफ सिलेक्टर बनण्याची शर्यत इंटरेस्टिंग बनली आहे. टीम इंडियाचे माजी ओपनर वसीम जाफर यांनी सिलेक्टर पदासाठी अर्ज केला आहे. अजित आगरकर यांचा कार्यकाळ बीसीसीआयने वाढवला नाही. जाफर यांच्या एन्ट्रीने नवीन चर्चा सुरु झाली आहे. वसीम जाफर यांनी पीटीआयशी बोलताना अर्ज केल्याची पृष्टी केली आहेत. वसीम जाफर आता 48 वर्षांचे आहेत. ते 31 कसोटी सामने खेळलेअसून त्यांनी 1944 धावा केल्या आहेत. वसीम जाफरच्या नावावर पाच कसोटी शतकं आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने द्विशतकी खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलेलं. पाकिस्तान विरुद्ध सुद्धा कोलकाता येथे त्याने दुहेरी शतक झळकावलेलं.

चीफ सिलेक्टरच्या नियुक्तीमध्ये कसोटी सामन्यांचा अनुभव महत्वाचा ठरु शकतो. विद्यमान निवड प्रक्रियेनुसार, ज्या झोनच्या सदस्याने सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत, तो निवड समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी पात्र आहे. वसीम जाफरच्या नावावर 31 कसोटी सामने आहेत. माजी भारतीय फिरकीपटू प्रज्ञान ओझाने 24 कसोटी सामने खेळले आहेत. त्या दृष्टीने वसीफ जाफर यांच्या आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे त्यांची दावेदारी अधिक पक्की होते. केवळ कसोटी सामन्यांच्या संख्येच्या आधारावर त्यांची नियुक्ती निश्चित मानता येणार नाही. अंतिम निर्णय क्रिकेट सल्लागार समिती आणि बीसीसीआयच्या प्रक्रियेअंतर्गत होईल.

Loading...

तो भारतासाठी दोन कसोटी सामने खेळला आहे

क्रिकेट सल्लागार समितीमध्ये अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश आहे. ज्यांनी अर्ज केलाय, त्यांच्या अनुभवाचा अभ्यास ते करतील. वसीम जाफर यांनी अर्ज केला असला तरी प्रज्ञान ओझा यांना बीसीसीआय अंतर्गत समर्थन असल्याचं समजतय. प्रज्ञान ओझा यांना निवड समितीचं अध्यक्ष बनवावं असं बीसीसीआयमध्ये अनेकांच ठोस मत आहे. प्रज्ञान ओझा प्राधान्य मिळालं तर निवड समितीचं स्वरुप वेगळं असेल. अशावेळी माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार सुद्धा निवड समितीमध्ये स्थान मिळवण्याचा दावेदार असेल. तो भारतासाठी दोन कसोटी सामने खेळला आहे. पश्चिम झोनचा संभाव्य उमेदवार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us