WATCH: एवढ्या फोटोंचे काय करता…,रोहित शर्माने विमानतळावर विचारला प्रश्न

सततच्या फोटो काढण्यामुळे रोहित शर्मा संतापला, पाहा काय म्हणाला...

WATCH: एवढ्या फोटोंचे काय करता...,रोहित शर्माने विमानतळावर विचारला प्रश्न
rohit sharma
Image Credit source: twitter
| Updated on: Dec 03, 2022 | 8:47 AM

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बांगलादेश (BAN) दौऱ्यावर आहे. विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली होती. बांगलादेशमध्ये टीम इंडिया कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. टीम इंडियामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. सध्याची मालिका अनेक खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण पुढच्यावर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत ज्यांना संधी हवी आहे. त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

ज्यावेळी रोहित शर्मा बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना होणार होता. त्यावेळी मुंबईच्या विमानतळावर त्यांच्यासोबत पापाराझी यांनी फोटो काढले. त्यावेळी संतापलेल्या रोहितने एवढ्या फोटोचं काय करता असा प्रश्न केला. त्यावर पापाराझी यांनी रोहित शर्माला उत्तर दिल्याचा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पापाराझी यांनी रोहितला उत्तर दिले, की मी मीडियाकडून आहे, मला मीडियाला फोटो द्यावे लागतात. ही माझी ड्यूटी आहे. त्यावर रोहित शर्माने काहीचं उत्तर दिलं नाही. रोहित शर्माचा तो व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून रोहितचा फॉर्म खराब राहिला आहे.

विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी झाल्यानंतर बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली होती. तसेच येत्या काळात टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार असल्याचे संकेत सुध्दा दिले आहेत. T20 फॉरमॅटमधील कर्णधारपद हार्दीक पांड्याला देण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे.