“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही”, विखे पाटलांचं उदाहरण देत सामनातून भाजपवर निशाणा

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

|

Updated on: Dec 03, 2022 | 7:58 AM

सामनातून भाजपवर निशाणा

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, विखे पाटलांचं उदाहरण देत सामनातून भाजपवर निशाणा

मुंबई : राजकीय नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा वारंवार अपमान केला जातोय. त्यावर आजच्या सामनातून निशाणा साधण्यात आला आहे. “महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून मंत्र्या-संत्र्यांपर्यंत प्रत्येकजण स्वतःस महामहोपाध्याय किंवा शिवशाहीर असल्याच्या आविर्भावात डफावर थाप मारीत आहे, पण ही लोणकढी थापच म्हणावी लागेल!”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

“विखे पाटील हे कधीकाळी मर्दमऱ्हाठे मावळे म्हणून शिवरायांचे भक्त होते. आज भाजपात जाऊन त्यांना शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे गुणगान करावे लागते. वीर मराठय़ांचा हा देश आहे या कल्पनेस यामुळे धक्का बसतो. एकंदरीत भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयनराजे म्हणतात तेच खरे की, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात?’ हा निर्लजपणाच आहे!”, असं म्हणत सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांची तुलना शंभर तोंडांच्या रावणाशी करताच मोदी व त्यांच्या लोकांनी लगेच काँग्रेस व खरगेंवर प्रतिहल्ले सुरू केले. मोदींना रावणाची उपमा देणे हा गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे जाहीर सभांतून ढोल-नगारे वाजवून सांगण्यात येत आहे. गुजराती जनतेने मोदींच्या अपमानाचा बदला घेतला पाहिजे असे मोदी सांगू लागले. पंतप्रधानांचा अपमान करणे हे चूकच आहे. मात्र जर मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान ठरत असेल तर छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ‘भाजप’ पाठीशी घालते, त्यांचा बचाव करते यास काय म्हणावे? मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही असे भाजपचे म्हणणे आह?, असं सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI