
WCL 2025 : भारतातल्या आयपीएल या क्रिकेट स्पर्धेची जशी जगभरात चर्चा असते, त्याच पद्धतीने वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स अर्थात डब्ल्यूसीएल स्पर्धेचीही क्रिकेटचे चाहते वाट असतात. दरम्या आता या स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सर म्हणून एका मोठ्या कंपनीच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चांगले काम करणारी तसेच लोकांनी ठेवलेला विश्वास सार्थ करणारी दुगास्ता प्रॉपर्टीज ही प्रॉपर्टी डेव्हलपर कंपनी यावेळी डब्ल्यूसीएल स्पर्धेची टायटल स्पॉन्सर असणार आहे.
डब्ल्यूसीएल ही क्रिकेट स्पर्धा एक जागतिक पातळीवरील टी-20 स्पर्धा आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे अनुभवी खेळाडू क्रिकेट खेळतात. त्यामुळेच ही स्पर्धा अनेक अर्थांनी खास असते.
डब्ल्यूसीएल ही स्पर्धा फारच लोकप्रिय आहे. ही स्पर्धा पहिल्याच सिझनमध्ये वेगवेगळ्या मंचांच्या माध्यमातून तब्बल 32 कोटी लोकांनी पाहिलेली आहे.यावेळची WCL 2025 स्पर्धा तर अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण यावेळी क्रिकेट रसिकांना एबी डीव्हिलियर्स, शिखर धवन, किरेन पोलार्ड, ख्रिस लिन, इऑन मॉर्गन आणि अॅलिस्टर कुक यासारखे दिग्गज माजी क्रिकेटपटून पुन्हा एकदा क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे युवराज सिंह, सुरेश रैना, ब्रेट ली, ख्रिस गेल, रॉबिन उथप्पा यासारखे दिग्गज खेळाडूही तुम्हाला पुन्हा एकदा क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहेत.
दुसरीकडे या स्पर्धेचे टायटल स्पॉर्न्सर म्हणून मान मिळाल्यानंतर दुगास्ता प्रॉपर्टीज या कंपनीचे अध्यक्ष तौसीफ खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दुगास्ता प्रॉपर्टीज या कंपनीला वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स- 2025 या स्पर्धेची टायटल स्पॉन्सरशीप मिळणे ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. क्रिकेट हा फक्त खेळ नाही. तो एक वारसा आहे. क्रिकेट हा खेळ गौरवाचे प्रतिक आहे,” अशा भावना तौसिफ खान यांनी व्यक्त केल्या आहेत.
दुगास्ता प्रॉपर्टीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ अजान खान यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. “व्यापाराच्या पलीकडे जाऊन पाहणारे तसेच संस्कृतीशी नाळ जोडलेल्या लोकांशीच भागिदारी करायला आम्हाला आवडते. डब्ल्यूसीएल एक गतिमान वारसा आहे. तसेच ही स्पर्धा म्हणजे एक उत्सव आहे,” असेही अजान खान म्हणाले.
दरम्यान, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स- 2025 पुढील आठवड्यात 18 जुलै रोजी सुरू होईल. यावेळी हे सामने इंग्लंडमधील बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन, लीड्समधील हेडिंग्ले, नॉर्थम्प्टनशायरमधील काउंटी ग्राउंड आणि लीसेस्टरमधील ग्रेस रोड येथे खेळवले जातील.