तुला कोणत्या गोष्टीचा पश्चाताप? लोक तर नेहमी विचारतात, मी म्हणतो…रोहित शर्माने सांगितले ते सत्य

Indian Cricketers Rohit Sharma : भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने एका प्रश्नावर खास उत्तर दिले आहे. तो म्हणाला की त्याला अनेकदा विचारणा झाली आहे की, त्याला जीवनात कोणत्या गोष्टीचा पश्चाताप झाला, त्यावर त्याने हे उत्तर दिले आहे.

तुला कोणत्या गोष्टीचा पश्चाताप? लोक तर नेहमी विचारतात, मी म्हणतो...रोहित शर्माने सांगितले ते सत्य
रोहित शर्मा
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 03, 2025 | 8:56 AM

भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने एका प्रश्नावर थेट उत्तर दिले आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा पश्चाताप झाला अशी अनेकदा त्याला विचारणा झाली. त्यावर त्याने उत्तर दिले आहे. त्याच्या मते, त्याला जीवनात कशाचाच पश्चाताप नाही. 25 वर्षांपूर्वी काय होतं आणि आता काय आहे, त्याने काय मिळवलं आहे? जे विधिलिखित आहे ते घडत आहे. जे घडत आहे, मी त्यावर समाधानी आहे. मला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नाही. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी दोनदा जिंकली. तर विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला.

मी आनंदी आहे

रोहित शर्माने हरभजन सिंह आणि गीता बसरा यांच्या हु इज द बॉस? या कार्यक्रमात हजेरी लावली होती. मला अनेक मुलाखतीत तुम्हाला कशाचा पश्चाताप झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. मी म्हटलं कशाचा पश्चाताप? जर मी 25 वर्षे मागे गेलो तर मला माहिती आहे की माझे आयुष्य कसे होते आणि ते कसे आहे. मला आनंद आहे की, देवाने मला त्यासाठी निवडले. मी कधी विचार केला नव्हता की हे सर्व पुरस्कार आणि यश मला मिळेल. या गोष्टी तुमच्यासाठी लिहिण्यात येतात आणि मी त्यासाठी आनंदी आहे.

2007 मध्ये आंतरराष्ट्रीय मैदानात

रोहित शर्माने वर्ष 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली होती. त्यापूर्वी तो 19 वर्षांखालील विश्वचषक संघात सहभागी झाला होता. भारतीय मैदान त्याने गाजवले होते. त्याला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली होती. विराट कोहली पूर्वी तो भारतासाठी खेळला होता. 2007 मध्ये टी20 विश्वकप जिंकणाऱ्या संघाचा तो घटक होता. कर्णधार म्हणूनही तो यशस्वी ठरला. त्याने भारताला दोन आशिया कप, एक टी20 विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफीशिवाय अनेक मालिका जिंकून दिल्या. आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला. नंतर कॅप्टन कूल धोनीने या विक्रमाची बरोबरी केली.