पुरूषात असतील हे गुण तर महिला होतात लट्टू; ओवाळून टाकतात जीव, तुमच्यात आहेत का या सवयी?
woman fall in love with these Man : अशा पुरुषांवर महिला एकदम भाळतात. त्यांच्यात जर हे गुण असतील तर या महिला त्या खास व्यक्तीसाठी जीवाचे रान करतात. त्याच्यासाठी जगाशी दोन हात करायला ही त्या तयार होतात.

महिलांना केव्हा काय आवडेल हे सांगता येत नाही. त्या क्षणात कशामुळे दु:खी होतील आणि कुणावर फिदा होतील हे अनेकदा अचंबितच नाही तर धडकी भरवणारे असते. जीवनसाथी अथवा प्रेमाची गोष्ट असेल तर महिला भावना, समजूतदारपणा आणि स्थैर्याला अधिक महत्त्व देतात. केवळ शारीरिक आकर्षण, दिखावा यावर त्या भाळतात असे नाही तर नात्यातील ओलावा आणि त्याग या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. हे विशिष्ट गुण असणार्या पुरुषांकडे महिला लवकर आकर्षित होतात आणि त्यांची साथ त्या सोडत नाहीत.
1. संवेदनशील आणि समजूतदार
संवेदनशील आणि समजूतदार पुरूष, स्त्रियांना आवडतात. भावना आणि संवेदना जाणून घेणारा पुरूष हवा. तिच्या मनातील गोष्टी जाणून घेणारा असावा. तिच्या दुःखात आणि वेदनांमध्ये तिच्या सोबत राहणारा पुरूष स्त्रियांना आवडतात.
2. आदर आणि सन्मान
सध्याच्या महिला समान विचारसरणी असलेल्या पुरुषांकडे अधिक आकर्षित असतात. त्यांना वाटते की त्यांच्या जोडीदाराने त्यांना सन्मान द्यावा. कोणतीही महिला त्या पुरुषासोबत आयुष्यभर साथ देतो, जो तिचा आत्मसन्मान टिकवतो. तिला तिचे स्वातंत्र्य देतो आणि सन्मानाची वागणूक देतो.
3. प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता
कोणत्याही नात्याचा पाया हा प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेवर आधारित असतो. शब्द आणि वचनांशी प्रामाणिक असणार्या पुरुषांकडे स्त्री आकर्षित होते. कठीण परिस्थिती जर पुरूष स्त्रीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला. तिचा विश्वास त्याने तोडला नाही. तर स्त्रिया त्याच्यासोबत कायम राहतात. खोटेपणा, विश्वासघात नातेसंबंधात अडचण उभी करतो.
4. जबाबदारीची जाणीव
जेव्हा एखादा पुरूष, कुटुंबाची, नातेसंबंधाची, करिअरची, जोडीदाराची जबाबदारी घेतो, तेव्हा तो स्त्रिला भावनिक आधार देत असतो. तो कोणत्याही परिस्थितीत त्या स्त्रीच्या पाठीशी उभा ठाकतो, तेव्हा ती तिच्यावर जीव ओवाळून टाकते. काही फेकूचंदवर ती भाळते पण तिला चूक दुरुस्त करायला वेळ लागत नाही.
5. संवाद साधण्याची, ऐकण्याची कला
केवळ संवाद साधण्याचीच नाही तर पुरुषात ऐकण्याची कला पण असते. तेव्हा तो त्या स्त्रीचा आवडता होतो. एक चांगला श्रोता स्त्रीचे मन जिंकतो असे म्हणतात. तिचे टोमणे असो वा तिची टीका जो ऐकतो आणि त्यावर स्वत:मध्ये सुधारणा करतो, तेव्हा असा पुरूष स्त्रीला प्रिय होतो.
