
मेलबर्न : जगभरातल्या क्रिकेटच्या चाहत्यांना (Cricket Fan) आतुरता असलेली मॅच (Match) होणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण सहातास मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. त्याचबरोबर पाऊस येतोय कधी थांबतोय अशी स्थिती आहे. त्यामुळे चाहते निराश असल्याचे सोशल मीडियावर स्पष्ट दिसत आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवर पावसाचं सावटं आहे.
कालपासून ऑस्ट्रेलियातील सीडनी येथील एमजीएच्या मैदान परिसरात पाऊस आहे. तसेच तिथं उद्या ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्याची मॅच होईल का याबाबत शंका आहे.
कमी षटकांचा सामना झाला तर, तो किती षटकाचा होईल अशी देखील चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरु आहे.
मॅचबाबत अनेकांनी आत्तापर्यंत भविष्यवाणी वर्तविली आहे. त्यामुळे उद्याच्या मॅचमध्ये नेमकं कोणता खेळाडू कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.
भारतीय टीम
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.