
भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चर्चेत आहे. त्याने नुकताच बालपणीची मैत्रिण सानिया चंडोकशी साखरपुडा केला. अचानक समोर आलेल्या या दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. अर्जुन आणि सानिया यांच्यातील नात्याच्या बातमीवर आतापर्यंत दोन्ही कुटुंबांनी अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायकल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती साखरपुड्याआधी कुठे गेली होती हे समोर आले आहे. चला पाहूया…
सारा तेंडुलकर आणि सानिया चंडोकचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती सानियासोबत साखरपुड्याआधी बाहेर गेल्याचे दिसत आहेत. ती नेमकी कुठे गेली होती? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.
साराने शेअर केला व्हिडीओ?
क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही, परंतु त्याची बहीण सारा त्याच्या अगदी उलट आहे. ती एक लोकप्रिय इन्फ्लुएंसर आहे आणि तिचे 8.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. साखरपुड्याच्या अफवांनंतर चाहते तिच्या पोस्टवर, विशेषतः सानियासोबतच्या पोस्टवर अधिक लक्ष देत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सारा आणि सानिया बीचवर गर्ल गँगसोबत ट्रिपचा आनंद घेताना दिसत आहेत.
काय आहे व्हिडीओ?
सारा तेंडुलकरने ऑक्टोबर 2024 मध्ये शेअर केलेल्या या व्हिडीओला इंस्टाग्रामवर 60 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज आणि 5 दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले होते, “टेबल फॉर थ्री.”
हा व्हिडीओ सारा आणि सानिया यांच्यातील बाँडिंग दाखवतो. साखरपुड्याच्या बातम्या समोर येताच सानियाबद्दल सर्वांचे कुतूहल वाढले. ती मुंबईत पशुवैद्यकीय तंज्ज्ञ म्हणून काम करते. अर्जुन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबासोबतच्या सानियाच्या जुन्या फोटोंनंतर आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये सानिया एका खाजगी कौटुंबिक समारंभात सहभागी होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सारा तेंडुलकरच्या पिलेट्स अकादमीच्या लॉन्चचा होता.