AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भल्याभल्यांना नादाला लावणारी सर्वात श्रीमंत बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही! एका रात्रीत कमावत होती 90 लाख

देशातील सर्वात श्रीमंत बार गर्ल कोण होती? ती एका रात्रीत किती रुपये कमवायची? असे अनेक प्रश्न पडतात. पण तुम्हाला माहिती आहे का एक काळ असा होता की एका बार गर्लचे लाखो दिवाने होते. अक्षरश: क्रिकेटपटूंपासून अनेकजण तिच्यावर फिदा होता. तिच्यावर एका रात्रीत लाखो रुपये उडवले जायचे. आता ती कोण होती चला जाणून घेऊया...

भल्याभल्यांना नादाला लावणारी सर्वात श्रीमंत बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही! एका रात्रीत कमावत होती 90 लाख
Richest Bar GirlImage Credit source: Freepik
| Updated on: Aug 15, 2025 | 4:03 PM
Share

सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात 2005 पासून बंद असलेले डान्स बार पुन्हा एकदा गजबजणार आहेत. हे बार बंद झाल्यामुळे येथे नाचणाऱ्या डान्सर्सनी दुबई आणि बँकॉकचा रस्ता धरला होता. मुंबईत एक काळ असा होता जेव्हा हे बार रात्रभर गजबजलेले असायचे आणि येथे काम करणाऱ्या बार गर्ल्सवर नोटांचा पाऊस पडायचा. त्या काळात एक बार गर्ल तर अशी होती की ती एका रात्रीत 90 लाख रुपयांची कमाई करायची. आता ही बार गर्ल नेमकी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला जाणून घेऊया तिच्या विषयी…

देशातील सर्वात श्रीमंत बार गर्लचे नाव तरन्नुम खान असे होते. तिने (बार बाला) खूप प्रसिद्धी आणि पैसा कमावला. तरन्नुमला देशातील सर्वात श्रीमंत बार बाला असेही म्हटले जाते. तिच्यावर एका रात्रीत 90 लाख रुपये उडवले गेले होते. आज आम्ही तुम्हाला तरन्नुमची संपूर्ण कहाणी सांगणार आहोत. चला जाणून घेऊया…

वाचा: महिला पाय क्रॉस करून का बसतात? फक्त स्टाइल की आहे खास कारण? जाणून घ्या…

दंगलीने बदलले आयुष्य

मुंबईच्या अंधेरी भागात राहणाऱ्या तरन्नुमचे वडील एक छोटे दुकान चालवायचे. तरन्नुमच्या कुटुंबात तिचा भाऊ, बहीण यांच्यासह एकूण 6 जण होते. या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नातून या 6 जणांच्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह व्हायचा. 1992 मध्ये झालेल्या दंगलीत तरन्नुमचे घर आणि दुकान लुटले गेले. संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. त्यांना रिलीफ कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आली. यानंतर या सगळ्या धक्क्याने तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जीव गेला. घरची आर्थिक परिस्थिती पाहता तरन्नुमला डान्स बारमध्ये काम करण्यास भाग पडले.

एका रात्रीत 90 लाख

यानंतर तरन्नुमने मुंबईच्या दीपा बारमध्ये काम सुरू केले. बारमध्ये काम करताना काही काळातच तरन्नुम इतकी प्रसिद्ध झाली की तिचा नाच पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येऊ लागले. तरन्नुमवर एका रात्रीत लाखो रुपये लुटवणारे शेकडो लोक होते. याच लोकांमुळे तरन्नुम काही दिवसांतच मुंबईची करोडपती बार बाला बनली. तरन्नुमने वयाच्या 16व्या वर्षापासून बारमध्ये नाचण्याचे काम सुरू केले होते. तरन्नुमला मुंबईतील सर्वात सुंदर बार गर्ल असेही म्हटले जायचे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, स्टँप पेपर घोटाळ्याचा मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी हा तरन्नुमचा दीवाना होता. एका रात्री त्याने तरन्नुमवर 90 लाख रुपयांहून अधिक रक्कम लुटवली होती.

पुढे तरन्नुमचे काय झाले?

तेलगीच्या अटकेनंतर तरन्नुम गायब झाली असे नाही. ती पुन्हा एकदा चर्चेत आली जेव्हा आयकर विभागाच्या छाप्यात तिच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचे उघड झाले. तिच्या माहितीतील उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि संपत्तीतील गुंतवणुकीचा खुलासा झाला होता. आयटी अधिकाऱ्यांना तिच्या मोबाइल फोनमध्ये सट्टेबाज आणि एका श्रीलंकन क्रिकेटपटूचा टेलिफोन नंबर सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास आपल्या हाती घेतला. तरन्नुमवर कथितपणे क्रिकेट सट्टेबाजीचा रॅकेट चालवल्याचा आरोप लावण्यात आला होता. तिला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले होते. 2015 मध्ये 2 महिने तुरुंगात घालवल्यानंतर तिला जामिनावर सोडण्यात आले होते.

ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.