
बॉलिवूडमधील कलाकारांच्या लक्झरी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता असायची. पण कलाकारांसोबतच क्रिकेटर्सच्या आयुष्याबद्दलही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. क्रिकेटर्सचे कपडे ते शूजच्या ब्रँडपासून सर्वकाही जाणून घेणे चाहत्यांनाही आवड असतेच.
बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच क्रिकेटर्सना महागड्या आणि आलिशान गाड्यांचा शौक असतो. अनेकजण तर कोट्यवधी किंमत असलेल्या कार खरेदी करतात. हार्दिक, कोहली, धोनी अशा दिग्गज क्रिकेटर्सच्या नावांचा समावेश आहे. तेव्हा टीम इंडियाच्या कोणत्या क्रिकेटरकडे सर्वात महागडी कार आहे याबाबत जाणून घेऊयात. या क्रिकेटर्समध्ये 6 ते 7 जणांची नावे आहेत जे करोडोंची कार वापरतात.
7. जसप्रीत बुमराह
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे सर्वात महागडी कार मर्सिडीज मेबॅक एस560 आहे. तिची किंमत सुमारे 2.11 कोटी रुपये आहे.
6. श्रेयस अय्यर
आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरकडे लॅम्बोर्गिनी हुराकन ईव्हीओ आहे. त्याची किंमत 3.73 कोटी रुपये आहे.
5.केएल राहुल
आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी शानदार कामगिरी करणारा विकेटकीपर फलंदाज केएल राहुलकडे अॅस्टन मार्टिन डीबी11 आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 4.2 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलकडे अॅस्टन मार्टिन DB11 देखील आ
4. विराट कोहली
कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि त्याच्याकडे सर्वात महागडी कार, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 4.04 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेंटले व्यतिरिक्त, कोहलीकडे ऑडी आर8 एलएमएक्स, ऑडी क्यू8 आणि ऑडी आरएस 5 सारख्या अनेक लक्झरी कार आहेत.
3. रोहित शर्मा
भारतीय संघाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मालाही महागड्या आणि आलिशान गाड्यांचा शौक आहे. रोहितकडे लॅम्बोर्गिनी उरुस आहे. या कारची किंमत 4.18 कोटी ते 4.57 कोटी रुपयांपर्यंत आहे. रोहित शर्माच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज-बेंझ एस-क्लास देखील आहे.
2.रवींद्र जडेजा
भारतीय संघाचा डॅशिंग अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे अनेक प्रकारच्या गाड्या आहेत. जडेजाकडे एक महागडी कार रोल्स रॉयस व्रेथ. बाजारात त्याची शोरूमची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. ही कार फक्त 4.5 सेकंदात 0 ते 100 पर्यंत जाऊ शकते.
1. हार्दिक पांड्या
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याकडे सर्वात महागडी कार आहे. हार्दिककडे रोल्स रॉयस फॅंटम आहे. या कारची भारतात शोरूम किंमत सुमारे 9.50 कोटी रुपये आहे.