
Palash Muchhal Cheated On Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाने तिचे लग्न पुढे ढकलले आहे. संगीतकार, दिग्दर्शक पलाश मुच्छल याच्याशी तिचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होते. परंतु लग्नाच्या काही तास अगोदर स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने स्मृतीने स्वत:चे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. असे असतानाच आता स्मृतीला अंधारात ठेवून पलाश अन्य एका मुलीला बोलत असल्याचा दावा केला जातोय. तसे काही स्क्रीनशॉटदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच कारणामुळे पालशने जिच्यासाठी स्मृती मानधनाचा कथितपणे विश्वासघात केला, ती मुलगी नेमकी आहे तरी कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्मृती मानधाना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलल्यानंतर अनेक दावे केला जात आहेत. सध्या स्मृतीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे असतानाच पलाशने स्मृतीचा विश्वासघात केला, असा दावा केला जातोय. इकडे स्मृतीसोबत रिलेशनशीपमध्ये असताना तो दुसरीकडे मेरी डिकॉस्टा नावाच्या मुलीशी चॅटिंगच्या माध्यमातून बोलत होता, असा दावा करणारे काह स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या स्क्रीनशॉटमध्ये पलाश त्या मुलीशी आमचे लाँग डिस्टन्स रिलेशनशीप असून स्मृतीसोबतचे माझे नाते जवळपास संपल्यातच जमा आहे, असे या चॅटिंगमध्ये कथितपणे सांगताना दिसतोय. विशेष म्हणजे पलाश मुच्छल या मेरी डिकॉस्टा नावाच्या मुलीला भेटायलाही बोलवत असल्याचे या कथित चॅटिंगमधून दिसत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर मेरी आणि पलाश यांच्या कथित चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर मेरी डिकॉस्टा नेमकी कोण आहे? असा सवाल केला जातोय. मेरी डिकॉस्टा ही एक कोरिओग्राफर असल्याचे म्हटले जातेय. सोबतच पलाश आणि स्मृती यांच्या लग्नसोहळ्यामध्ये त्या दोघांच्या डान्सची कोरीओग्राफीदेखील तीच करणार होती, असा दावा केला जातोय.
दरम्यान, सोशल मीडियावर हे स्क्रीनशॉट व्हायरल होत असले तरीही त्याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. या स्क्रीनशॉटची सत्यता पटवून देणारा कोणताही आधार अद्याप तरी समोर आलेला नाही. स्मृती आणि पलाश या दोघांनीदेखील या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.