AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Singh : बेस्ट फिनिशर रिंकू सिंहचं करिअरचं फिनिश का? अफगाणिस्तान विरुद्ध T20 सीरीजसाठी टीममधून ड्रॉप करण्याचं कारण आलं समोर

Rinku Singh : रिंकू सिंहला बेस्ट फिनिशर मानलं जातं. टी20 क्रिकेटमधला तो उत्तम खेळाडू आहे. पण अफगाणिस्तान विरूद्धच्या टी 20 सीरीजसाठी त्याला टीममधून ड्रॉप करण्यात आलय. यामागची कारणं काय आहेत? ते आता समोर आलं आहे.

Rinku Singh : बेस्ट फिनिशर रिंकू सिंहचं करिअरचं फिनिश का? अफगाणिस्तान विरुद्ध T20 सीरीजसाठी टीममधून ड्रॉप करण्याचं कारण आलं समोर
Rinku Singh
| Updated on: Sep 02, 2026 | 1:30 PM
Share

अफगाणिस्तान विरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. टीमची कमान श्रेयस अय्यरच्या हातात असून तिलक वर्मा उपकर्णधार आहे. यावेळी टीममध्ये मोठे बदल पहायला मिळाले आहेत. संजू सॅमसनने टीममध्ये पुनरागमन केलय. जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वॉशिंगटन सुंदर आणि नीतीश कुमार रेड्डी यांनी फिटनेस टेस्ट पास करुन टीममध्ये स्थान मिळवलं आहे. रिंकू सिंहला वगळण्यात आलं आहे. रिंकू झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग होता. आता अफगाणिस्तान विरूद्धच्या सीरीजसाठी अचानक त्याचं नाव गायब झाल्याने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. रिंकू सिंहचं टी 20 करिअर संपण्याच्या मार्गावर आहे का? असे प्रश्न चाहत्यांकडून विचारले जात आहेत.

रिंकू सिंहला का बाहेर बसवलं? त्यामागचं कारण बीसीसीआयच्या निवड समितीने स्पष्टपणे सांगितलेलं नाही. रिंकू सिंहची सर्वात मोठी ताकद त्याची फिनिशिंग स्टाइल आहे. रिंकूने अनेकदा भारताचा डाव अडचणीत असताना वेगाने धावा बनवल्या आहेत. पण टी20 क्रिकेटमध्ये भारताकडे आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक सीरीजमध्ये टीम मॅनेजमेंट सर्व कॉम्बिनेशन वापरुन पाहत आहेत. रिंकूचं अलीकडचं प्रदर्शन किंवा झिम्बाब्वे दौऱ्यावरील त्याची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नाहीय. म्हणूनच त्याला टीममधून ड्रॉप करण्यात आलय.

वर्ल्ड कप, झिम्बाब्वे टूरमध्ये रिंकूने किती धावा केल्यात?

झिम्बाब्वे दौऱ्यावर रिंकू आपल्या बॅटने विशेष कमाल दाखवू शकला नाही. 3 सामन्यात रिंकूने अवघ्या 37 धावा केल्या. रिंकू 2026 मध्ये टी20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता. टी 20 वर्ल्ड कपमध्ये रिंकूने 5 इनिंगमध्ये फक्त 24 धावा केल्या. यावर्षी आयपीएलमध्ये सुद्धा रिंकू अपेक्षेनुसार प्रदर्शन करु शकला नाही. 11 डावात 148.98 च्या स्ट्राइक रेटने त्याने 295 धावा केल्या. रिंकू सध्या यूपी टी20 लीगमध्ये मेरठ मावेरिक्स टीमच नेतृत्व करतोय. मेरठसाठी खेळताना रिंकूने 9 डावात 178.85 च्या स्ट्राइक रेटने 372 धावा केल्या आहेत. या अशाच कारणांमुळे रिंकू सिंहचा टीम इंडियात समावेश केलेला नाही.

टीम इंडियाचा स्कॉड : श्रेयस अय्यर (कॅप्टन), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती