
आता रणजी ट्रॉफी सीजन सुरु आहे. जेतेपद मिळवण्यासाठी राज्याच्या क्रिकेट टीम्सनी कंबर कसली आहे. मुंबईने दिल्ली विरुद्ध लीग मधील शेवटच्या साखळी सामन्यात स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालला टीम बाहेर केलं. असं का केलं? त्या बद्दल मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या बद्दल खुलासा केला. यशस्वी जैस्वाल ठराविक निवडक सामने खेळत होता, म्हणून त्याला टीममध्ये स्थान दिलेलं नाही. टीम निवडण्याआधी होणाऱ्या बैठकीला त्याच्या उपलब्धतेविषयी कोणतीच माहिती मिळत नव्हती. यशस्वी जैस्वाल न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांची टी 20 सीरीज खेळणाऱ्या टीमचा भाग नाहीय. पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी सुद्धा त्याचा टीममध्ये समावेश केलेला नाही.
भारतीय क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाच्या खेळाडूंना राष्ट्रीय टीममध्ये तुम्ही नसाल, तेव्हा देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ग्रुप स्टेजमधील काही सामन्यांच्या उपलब्धतेविषयी जैस्वालशी संपर्क साधण्यात आला. पण त्याच्याकडून काही उत्तर मिळालं नाही. एमसीएच्या एका सीनियर अधिकाऱ्याने रविवारी सांगितलं की, मागच्या हैदराबाद विरूद्धच्या सामन्याच्यावेळी टीम निवडीआधी त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नव्हता. असं दिसतय की तो निवडक सामने खेळतोय.
फक्त एक सामना खेळला आहे
आम्ही मागचे सामने आणि पुढचे येणारे सामने यासाठी टीम निवडण्याआधी त्याच्याशी संपर्क साधला होता. पण आम्हाला काही उत्तर मिळालं नाही, असं अधिकाऱ्याने सांगितलं. म्हणून दिल्ली विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी त्याचा टीममध्ये समावेश केलेला नाही. जैस्वाला चालू सत्रात रणजी ट्रॉफीमध्ये फक्त एक सामना खेळला आहे. यात जयपूरमध्ये राजस्थान विरुद्ध ड्रॉ झालेल्या सामन्यात त्याने 67 आणि 156 धावा केल्या होत्या.
मुंबईची वानखेडेवरची मॅच दुसरीकडे का हलवली?
डावखुऱ्या यशस्वी जैस्वालने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (टी20) आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रत्येकी तीन-तीन सामने खेळले आहेत. शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे बाहेर आहे. सिद्धेश लाड मुंबईचं नेतृत्व करतोय. मुंबई आणि दिल्लीमधील सामना 29 जानेवारीला बीकेसी मैदानावर सुरु होणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर सात फेब्रुवारीला भारत आणि अमेरिकेत टी 20 वर्ल्ड कपचा पहिला सामना होणार आहे. त्यामुळे सामन्याचं ठिकाण बदलावं लागेल. मुंबईची टीम सहासामन्यात चार विजय आणि दोन ड्रॉ सह एलीट ग्रुप डी पॉइंट टेबलमध्ये टॉपवर आहे.