AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : भारताला मिळणार नवा टेस्ट कॅप्टन ? रोहित शर्माबद्दल मोठी अपडेट

टीम इंडिया जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यावर रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल की नाही याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Rohit Sharma : भारताला मिळणार नवा टेस्ट कॅप्टन ? रोहित शर्माबद्दल मोठी अपडेट
रोहित शर्माImage Credit source: PTI
| Updated on: Mar 15, 2025 | 11:55 AM
Share

रोहित शर्माच्या उत्तम नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतेच चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आता भारतीय संघ जूनमध्ये पुन्हा मैदानात उतरणार असून तेव्हा टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 5 कसोटी सामन्यांची ही मालिका होणार आहे. पण या दौऱ्यावर रोहित शर्मा टीम इंडियाचा भाग असेल की नाही, आणि जर तो खेळला तर तो कॅप्टन असेल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. या दौऱ्यात रोहित कसोटीतून निवृत्त होऊ शकतो, अशा बातम्याही आल्या होत्या. मात्र, त्यानंतर रोहितने निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले. आता त्याच्या कर्णधारपदाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

काय आहे नवी अपडेट ?

चॅम्पियन ट्रॉफीच्या जेतेपदानंतर रोहित शर्माच्या कारकिर्दीत मोठे वळण आले आहे. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, आणखी एका मोठ्या दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समितीचा पाठिंबा रोहित शर्माला मिळाला आहे. त्यामुळे जून महिन्यातील इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा हाच टीम इंडियाचा कॅप्टन असण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयामुळे रोहित शर्माची कारकीर्द आणखी लांबू शकते, असा कयास वर्तवला जात आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशामुळे उपस्थित झाले अनेक प्रश्न

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3-1असा पराभव स्वीकारावा लागला होता. या काळात त्याच्या खराब कामगिरीमुळे रोहितने मालिकेतील शेवटचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्माने विश्रांती घेताच ही मालिका संपताच तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या अफवा चाहत्यांमध्ये पसरू लागल्या. रोहितने कसोटीचा फॉरमॅट सोडावा, असे मत काही दिग्गजांनी व्यक्त केलं होतं. पण रोहितने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देताना मोठे वक्तव्य केलं.

सिडनी कसोटीच्या दुस-या दिवशी लंच टाईमवर एका वाहिनीशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, ‘आत्ता धावा निघत नाहीयेत, पण 5 महिन्यांनंतरही त्या येणार नाहीत याची शाश्वती नाही. मी मेहनत करीन. पण हा निर्णय निवृत्तीचा नाही. मी निवृत्त कधी व्हायचं आणि मला काय निर्णय घ्यायचा ते बाहेर लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक ठरवू शकत नाहीत,’ असं रोहितने सुनावलं होतं. रोहितने या मालिकेतील 3 सामन्यात 3, 6, 10, 2 आणि 9 धावांची इनिंग खेळली होती. म्हणजेच भारतीय कर्णधाराने 5 डावात 6.20 च्या सरासरीने एकूण 31 धावा केल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआय इंग्लंड मालिकेत नवीन कर्णधाराची निवड करू शकते, असा दावा त्यानंतर करण्यात येत होता. मात्र सध्या तशी कोणतीही परिस्थिती नसून रोहितच कर्णधारपद शाबूत असल्यातचं चित्र दिसत आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन