Sara Lee : WWE च्या स्टार महिला खेळाडूचं निधन

WWE व्यतिरिक्त अलेक्सा ब्लिस, बेकी लिंच, मिक फॉली यांसारख्या अनेक स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला.

Sara Lee : WWE च्या स्टार महिला खेळाडूचं निधन
sara lee
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 07, 2022 | 2:29 PM

WWE सगळ्यांना पाहायला आवडतं, जगभरातील लोकं ते पाहत असतात. क्रीडा जगतासाठी नुकतीचं दु:खद बातमी उजेडात आली आहे. WWE ची कुस्तीपटू सारा लीचं (Sara Lee) नुकतचं निधन (Death) झालं आहे. ही बातमी तिच्या आईने इंन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून चाहत्यांना सांगितली आहे. सारा लीचं वय फक्त 30 आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना अत्यंत वाईट वाटलं आहे. चाहते खूपच अस्वस्थ झाले असून तिला कमेंटच्या माध्यमातून तिला श्रध्दांजली वाहत आहेत.

2016 मध्ये सारा लीने WWE मध्ये करिअरला सुरुवात केली होती. तिने सुद्धा अनेक सामने आत्तापर्यंत गाजवले आहेत. त्यामुळे तिची सोशल मीडियावर अधिक चर्चा असायची. तिच्या चांगल्या मॅचचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

WWE व्यतिरिक्त अलेक्सा ब्लिस, बेकी लिंच, मिक फॉली यांसारख्या अनेक स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला.

क्रिकेट विश्वासाठी ही बातमी अत्यंत धक्कादायक, मृत्यूचं कारण अद्याप समजलेलं नाही.