
क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकर याची ओळख आहे. विशेष म्हणजे सचिनने त्याच्या करिअरमध्ये अनेक रेकॉर्ड तयार केली. सचिन तेंडुलकर याने एक काळ गाजवला फक्त भारतातच नाही तर सचिनची मोठी फॅन फॉलोइंग विदेशातही आहे. सचिन तेंडुलकर यांच्या पावलावर पाऊल टाकत सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर हा देखील क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. गेल्या काही वर्षांपासून अर्जुन हा गोव्याकडून खेळतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अर्जुन हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धमाकेदार खेळी खेळताना दिसला. मोठा रेकॉर्ड सचिन तेंडुलकर याच्या लेकाने रचला. भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर हे दोघे खूप जास्त चांगले मित्र आहेत. काही दिवसापूर्वी युवराज आणि सचिन तेंडुलकर एका रिजॉर्टमध्ये चांगला वेळ घालवताना दिसले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी नुकताच सचिनच्या लेकाबद्दल अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारे विधान केले. योगराज सिंह याने अर्जुन तेंडुलकरबद्दल केलेल्या विधानाने चांगलीच खळबळ उडाली. योगराज सिंग यांनी म्हटले की, अर्जुन तेंडुलकर हा चांगला फलंदाज आहे. तो त्याच्या वडिलांसारखीच फलंदाजी करतो पण प्रशिक्षक त्याला संधी देत नाहीत.
पुढे बोलताना योगराज सिंग यांनी म्हटले की, अर्जुन याने माझ्या अकादमीत प्रशिक्षण घेतले आहे. मी स्वत: त्याला प्रशिक्षण दिले. अर्जुनने माझ्याकडे प्रशिक्षण घेतल्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये शतक केले. अर्जुन मुंबईकडून खेळत नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. या हंगामात तो लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळणार आहे. सर्व प्रशिक्षक अर्जुनच्या गोलंदाजीवर लक्ष देत आहेत, पण तो प्रामुख्याने फलंदाज आहे.
ते त्याच्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करत आहेत. मुळात म्हणजे या प्रशिक्षकांना काय झाले हेच मला कळत नाही. तो नक्कीच एक खूप जास्त चांगला फलंदाज आहे. तो माझ्या शिबिरात आल्यानंतर मी त्याची काळजी घेत असल्याचेही त्यांनी म्हटले. योगराज सिंग यांनी अर्जुन तेंडुलकर याच्याबद्दल केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली असून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. कारण अर्जुन तेंडुलकर हा करिअरच्या सुरूवातीपासूनच गोलंदाजी करतो. पण युवराजच्या वडिलांनी म्हटले की, तो चांगला फलंदाज आहे.