AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : ‘जर कुणाला वाटत असेल आम्ही सुनेत्रा काकींना कंट्रोल करू शकतो, तर..’ रोहित पवारांचा थेट हल्लाबोल

Rohit Pawar : "अजितदादांच्या यांच्या पक्षाचे जे कोणी चार लोक आहेत, त्यांनी त्या विषयाला जिवंत ठेवलय. त्याशिवाय त्यांचं महत्व दिसत नाही. मला फक्त एवढचं सांगायचं आहे की, राजकारण करण्याची ही वेळ नाही" असं रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar  : 'जर कुणाला वाटत असेल आम्ही सुनेत्रा काकींना कंट्रोल करू शकतो, तर..' रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
Sunetra pawar-Rohit Pawar
| Updated on: Feb 27, 2026 | 12:47 PM
Share

सुनेत्रा पवार काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या म्हणून तुम्ही स्टंट करताय, विलिनीकरणाची चर्चा करताय असा आरोप तुमच्यावर होतोय. त्यावर रोहित पवार बोलले आहेत. “कुठे काही तिथे घडलेलं नाही. आम्ही सर्वजण तिथे दु:खात होतो. पवारसाहेबांच्या तोंडून शब्द निघत नव्हते. तुम्ही बघितलं असेल दुसऱ्यादिवशी तिथे कुठे काही अडचण येऊ नये. म्हणून लोकांच्या हितासाठी पवारसाहेबांनी स्टेटमेंट वाचून दाखवलं. कॅमेऱ्याकडे बघून स्टेटमेंट दिलेलं नाही. पवार साहेबांना वाचून दाखवावं लागलं. ते भावनिक झालेले. अशी आमची परिस्थिती होती” असं रोहित पवार म्हणाले.

“तुम्ही राजकारण करत आहात. विलिनीकरण शब्द आम्ही जास्त वापरला की त्यांनी. अजितदादांच्या यांच्या पक्षाचे जे कोणी चार लोक आहेत, त्यांनी त्या विषयाला जिवंत ठेवलय. त्याशिवाय त्यांचं महत्व दिसत नाही. मला फक्त एवढचं सांगायचं आहे की, राजकारण करण्याची ही वेळ नाही” असं रोहित पवार म्हणाले.

‘कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो’

“पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा काकी झाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी आहेत. तिथे वागत असताना स्टेजवर सांभाळून वागा महाराष्ट्र बघतोय. महिलांचा आदर ठेवा” असं रोहित पवार यांनी सुनावलं. “दादांचं आमदार, कार्यकर्त्यांवर, महाराष्ट्रावर प्रेम होतं. जायला कोणाला कुठे जागा द्यायची हे ते नेते ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तुम्ही म्हणता आम्ही राजकारण करतोय. आम्ही भावनिक मुद्दा काढतो. काकींचा आदर आहे. सांभाळून वागा आणि सांभाळून बोला” अशी टीका रोहित पवार यांनी केली.

थोड्या दिवसाने लगचे कळेल, की ताकद काय असते

“काकींचं भाषण मी ऐकलं. त्यांचा संदेश चांगला होता. बाकीच्यांचं भाषण ऐकलं नाही. बाकीच्यांचं भाषण पूर्वीही चांगलं नव्हतं आताही नाही. कंटेट नव्हता. सुनेत्रा काकी सक्षम महिला आहे. पवार परिवाराच्या घटक आहेत. त्या पत्रकार परिषदेला सामोरे जाऊ शकतात. वाटेल तेव्हा मीडियाशी बोलू शकतात. जर कुणाला वाटत असेल आम्ही सुनेत्रा काकींना कंट्रोल करू शकतो. दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना कंट्रोल करू शकतो. तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसाने लगचे कळेल, की ताकद काय असते आणि नेता पार्टी कसा चालवतो हे दिसेल. या चार नेत्यांनी सांभाळून राहा. सांभाळून वागा” असा रोहित पवार यांनी इशारा दिला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...