सचिन तेंडुलकर याच्या लेकाने रचला इतिहास, थेट पलटवला सामनाच, अशी गोलंदाजी केली की फलंदाजानींही…
Arjun Tendulkar News : सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते. सचिननंतर आता त्याचा लेक अर्जुन तेंडुलकर मैदानात जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. नुकताच सचिनच्या लेकाने मोठा इतिहास रचला आहे.

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा लेक मागील काही दिवसांपासून त्याच्या क्रिकेटमुळे आणि खासगी आयुष्यामुळे चांगला चर्चेत आहे. अर्जुन तेंडुलकर याने सानिया हिच्यासोबत साखरपुडा केला. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा साखरपुडा झाला. अर्जुन सध्या त्याच्या क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करताना दिसतोय. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरने चार षटकांत तीन विकेट्स घेत गोव्याला चंदीगडवर मोठा विजय मिळवून दिला. हा एक मोठा रेकॉर्ड अर्जुन तेंडुलकरने रचला आहे. वडील सचिन तेंडुलकर यांच्या पावलावर पाऊल टाकत अर्जुन क्रिकेट सामन्यात धमाका करताना दिसतोय. तो मागील काही वर्षांपासून गोव्याकडूनच खेळतो. अर्जुन त्याच्या गोलंदाजीने चंदीगडच्या फलंदाजांना त्रास देताना दिसला. त्याच्या पहिल्याच षटकात शिवम भांबरीला क्लीन बोल्ड झाला.
शिवम भांबरीनंतर काही मिनिटातच अर्जुन तेंडुलकर याने अर्जुन आझाद आणि जगजीत सिंग यांनाही मैदानात टीकू दिले नाही. अर्जुनने तिसरी विकेट जबरदस्त अशा यॉर्करने घेतली. 174 धावांचे टार्गेट करताना चंदीगडचा संघ 19 षटकांत 121 धावांवर आला आणि अर्जुनने सामन्यातील शेवटचा कॅच घेतली, यासोबतच सामना संपला. आयुष म्हात्रेने 53 चेंडूत नाबाद 110 धावा केल्या. अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याने नाबाद 39 धावा केल्या.
या खेळीमुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली T-20 ट्रॉफीच्या एलिट ग्रुप अ सामन्यात विदर्भाचा सात विकेट्सने पराभव केला. गेल्या वर्षीच्या विजेत्या संघाला सुरूवातीला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. त्यानंतर म्हात्रेच्या खेळीमुळे एकाना स्टेडियमवर 13 चेंडू शिल्लक असताना 17.5 षटकांत 3 गडी गमावून 194 धावा करून 193 धावांचे लक्ष्य गाठले.
सचिन तेंडुलकरच्या लेकाना मोठा इतिहास रचला आहे. अर्जुन तेंडुलकर याने सानिया चंडोक हिच्यासोबत वयाच्या 25 व्या वर्षी साखरपुडा केला. चंडोक ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया आणि अर्जुन दोघे एकमेकांना लहानपणापासूनच ओळख होते. शेवटी दोघांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. सारा तेंडुलकर हिची देखील सानिया मैत्रीण आहे. सानिया आणि अर्जुन यांच्या साखरपुड्याला खास लोकांची उपस्थिती होती.
