AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल ट्रेड विंडोत अर्जुन तेंडुलकरवर या फ्रेंचायझीचा डोळा! शार्दुलला सोडण्याची तयारी?

आयपीएल 2026 स्पर्धेचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहे. पुढच्या महिन्यात मिनी लिलाव पार पडणार आहे. त्यात रिटेन्शन केलेल्या खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत द्यायची आहे. असं असताना अर्जुन तेंडुलकरसाठी फ्रेंचायझीने फिल्डिंग लावली आहे.

आयपीएल ट्रेड विंडोत अर्जुन तेंडुलकरवर या फ्रेंचायझीचा डोळा! शार्दुलला सोडण्याची तयारी?
आयपीएल ट्रेड विंडोत अर्जुन तेंडुलकरवर या फ्रेंचायझीचा डोळा! शार्दुलला सोडण्याची तयारी?Image Credit source: PTI
| Updated on: Nov 12, 2025 | 8:15 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोमुळे चर्चांना उधाण आलं आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सर्वात मोठी डील होणार असंच सध्यातरी दिसत आहे. संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नई सुपर किंग्स रवींद्र जडेजा आणि सॅम करनला सोडण्याच्या तयारी असल्याचं बोललं जात आहे. या डीलची सर्वत्र चर्चा रंगली असताना एक ट्रेड मात्र एकदम शांततेत होत आहे. शांतीत क्रांती होत असल्याचं क्रीडाप्रेमींची भावना आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शार्दुल ठाकुर आणि अर्जुन तेंडुलकरच्या अदलाबदलीसाठी चर्चा सुरु आहे. ही ट्रेड म्हणता येणार नाही तर वेगवेगळं ट्रान्झेक्शन होऊ शकतं. क्रीकबझच्या सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडू आपली फ्रेंचायझी बदलू शकतात. पण ऑल कॅश डीलच्या स्वरूपात हे होऊ शकतं. म्हणजेच दोघांची ट्रान्सफर एकमेकांवर अवलंबून आहे. दुसरीकडे, दोन्ही फ्रेंचायझीपैकी कोणी पहिला प्रस्ताव ठेवला हे मात्र अस्पष्ट आहे.

शार्दुल ठाकुर सध्या मुंबई संघाचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्व करत आहे. तर लखनौ सुपर जायंट्सने त्या मागच्या पर्वात 2 कोटींच्या बेस प्राईसवर रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतलं होतं. कारण मेगा लिलावात त्याला कोणीच भाव दिला नव्हता. त्याने मागच्या पर्वातील 10 सामन्यात 13 विकेट आणि 18 धावा केल्या होत्या. आयपीएल ट्रेड नियमानुसार, अधिकृत अदलाबदलीची घोषणा बीसीसीआयकडून केली जाते. त्यामुळे फ्रेंचायझी चिडीचूप आहेत. मुंबई क्रिकेट सर्कलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा करार शक्य आहे आणि याची अधिकृत घोषणा 15 नोव्हेंबरला खेळाडूंच्या रिटेन्शन आणि रिलीज लिस्टच्या घोषणेसह होऊ शकते.

अर्जुन तेंडुलकरला मेगा लिलावातील दुसऱ्या फेरीत 30 लाखांच्या बेस प्राईसवर मुंबई इंडियन्सने घेतलं होतं. त्याला घेण्यात तसं कोणी रस दाखवला नव्हता. पण मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी बोली लावली आणि घेतलं. मागच्या पर्वात अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यापूर्वी आयपीएल स्पर्धेत 5 सामने खेळला होता. यात त्याने 13 धावा देत 3 गडी बाद केले आहेत. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्जुन अष्टपैलू खेळी करत आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सला त्याच्याकडून अपेक्षा असाव्यात असं दिसतंय. पण आता ही डील खरंच होते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.