T20 World Cup:’तुम्ही फक्त त्यांच्याकडूनच अपेक्षा करता जे चांगले करू शकतात, गौतम गंभीरची टीम इंडियावर टीका

उद्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात फायनल मॅच होणार आहे. दोन्ही टीम मैदानात कसून सराव करीत आहेत.

T20 World Cup:तुम्ही फक्त त्यांच्याकडूनच अपेक्षा करता जे चांगले करू शकतात, गौतम गंभीरची टीम इंडियावर टीका
Gautam Gambhir
| Updated on: Nov 12, 2022 | 11:25 AM

मुंबई : टीम इंडियाने (Team India) विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर सडकून टीका होत आहे.  इंग्लंडविरुद्ध (ENG) लाजीरवाणा पराभव झाल्यापासून टीम इंडियातील खेळाडूंची असंख्य मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. ज्या खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत चांगली खेळी केली नाही त्या खेळाडूंवर गौतम गंभीर याने सुद्धा जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे 2007 साली टीम इंडियाने विश्वचषक जिंकला होता.

टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने जोरदार टीका केली आहे. तो म्हणतोय, “तुम्ही फक्त त्यांच्याकडूनच अपेक्षा करता जे चांगले करू शकतात. जे चांगली कामगिरी करत नाहीत, त्यांच्याकडे अपेक्षा करणं सुद्धा अत्यंत चुकीचं आहे.” असं गंभीरने सोशल मीडियावर लिहिलं आहे.

विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियातील अनेक खेळाडूंना चांगली कामगिरी करता आलेली नाही. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाला महत्त्वपुर्ण खेळी करता आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

सेमीफायनलच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी सुरुवात अधिक निराशाजनक केली. केएल राहून झटपट बाद झाला, त्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. एकामागून एक खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतला अशी टीम इंडियाची स्थिती होती. हार्दिक पांड्याने अंतिम ओव्हरमध्ये धुवाधार खेळी केली, त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 169 झाली होती.

उद्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात फायनल मॅच होणार आहे. दोन्ही टीम मैदानात कसून सराव करीत आहेत.