IPL 2020 : 15 वर्षाचा नूर अहमद सर्वात लहान, तर 48 वर्षाचा प्रवीण तांबे सर्वात वयस्कर खेळाडू

| Updated on: Dec 19, 2019 | 3:57 PM

इंडियन प्रीमिअर लीगसाठी (IPL) आज (19 डिसेंबर) कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव (Youngest and Oldest Player in IPL Auction Kolkata) होत आहे.

IPL 2020 : 15 वर्षाचा नूर अहमद सर्वात लहान, तर 48 वर्षाचा प्रवीण तांबे सर्वात वयस्कर खेळाडू
Follow us on

कोलकाता : इंडियन प्रीमिअर लीगसाठी (IPL) आज (19 डिसेंबर) कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव (Youngest and Oldest Player in IPL Auction Kolkata) होत आहे. यामध्ये 12 देशांच्या 332 खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात सर्वात वयस्कर असलेला भारताचा 48 वर्षाचा खेळाडू प्रवीण तांबे आणि सर्वात कमी वय असलेला अफगाणिस्तानचा 15 वर्षाचा खेळाडू नूर अहमद (Youngest and Oldest Player in IPL Auction Kolkata) आहे.

प्रवीण तांबेचा जन्म ऑक्टोबर 1971 मध्ये झाला. तो लेग ब्रेक स्पिनर आहे. 2013 मध्ये 42 वर्षाच्या वयात त्याने आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तांबेने 33 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यासोबतच 28 विकेट्स घेतल्या आहेत.

प्रवीण तांबे राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि सनराईजर्स हैद्राबाद संघातून खेळला आहे. 2016 मध्ये तांबे सात सामने खेळले होता.  2017 मध्ये हैद्राबाद संघाने तांबेला खरेदी केले होते. पण खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

नूर अहमद अफगाणिस्तानचा खेळाडू आहे. नूरचा जन्म 3 जानेवारी 2005 रोजी झाला. आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमात खेळणारा नूर हा सर्वात लहान खेळाडू आहे. नूर डावखुरा स्पिनर असलेला युवा खेळाडू आहे.

नूर अहमदला अफगाणिस्तानच्या अंडर 19 आणि डोमेस्टिक संघातून खेळण्याचा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत एकूण सात टी20 सामने खेळले आहेत. त्याने 8 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, लिलावात प्रवीण तांबेची मूळ किंमत 20 लाख रुपये आहे, तर नूर अहमदची मूळ किंमत 30 लाख रुपये आहे.