Yograj Singh : ‘मी मरायला तयार, हे देवा मला उचलं..’, अरेरे, युवराज सिंहच्या वडिलांवर काय दिवस आले? मनातलं दु:ख आलं बाहेर

Yuvraj Singh father Yograj Singh : युवराज सिंहचे वडिल योगराज सिंह यांनी एका इंटरव्यूमध्ये आपलं दु:ख व्यक्त केलं. मनातल सर्व काही बोलून गेले. "ज्या स्त्रीला मी माझं आयुष्य दिलं. पूर्ण जवानी दिली. ती सोडून जाऊ शकते यावर मला विश्वास बसत नव्हता"

Yograj Singh : मी मरायला तयार, हे देवा मला उचलं.., अरेरे, युवराज सिंहच्या वडिलांवर काय दिवस आले? मनातलं दु:ख आलं बाहेर
Yograj Singh
| Updated on: Nov 17, 2025 | 11:32 AM

Yograj Singh Painful Statement : युवराज सिंह याचे वडिल योगराज सिंह यांचं दु:ख समोर आलय. सध्या जो त्यांना त्रास होतोय, त्या बद्दल बोलताना ते स्वत:च्या मरणाबद्दल सुद्धा बोलले. द विंटेज स्टूडियोशी बोलताना योगराज सिंह यांचं दु:ख समोर आलं. अनेक वर्षांपासून त्यांच्या ह्दयात दबून असलेल्या गोष्टी बाहेर आल्या. बोलताना ते आयुष्याच्या त्या दिवसांबद्दलही बोलले, जे सर्वात भयानक होते. जेवणासाठी दुसऱ्यांवर अवलंबून रहाव लागतय. याला ते कंटाळले आहेत. आता मी मरायलाही तयार आहे असं योगराज बोलून गेले. “आयुष्याच्या एका वळणावर युवराज आणि त्याची आई शबनम मला सोडून गेली, त्यावेळी मला धक्का बसलेला. त्या घटनेने मी कोसळून गेलेलो” असं योगराज सिंह म्हणाले. “ज्या स्त्रीला मी माझं आयुष्य दिलं. पूर्ण जवानी दिली. ती सोडून जाऊ शकते यावर मला विश्वास बसत नव्हता. खूप काही बरबाद झालेलं” असं त्यांनी सांगितलं.

योगराज सिंह सुद्धा भारताकडून क्रिकेट खेळले आहेत. “आता जेवणासाठी दुसऱ्यांवर अवलंबून रहावं लागतय. कधी एकावर तर कधी दुसऱ्यावर. मी कधी कोणाला त्रास दिला नाही” योगराज सिंह म्हणाले की, “माझं जीवन आता पूर्ण झालय. मी आता मरायला तयार आहे. देवाची इच्छा असेल, तेव्हा तो मला नेऊ शकतो” असं योगराज म्हणाले.

योगराज सिंह किती इंटरनॅशनल सामने खेळले?

योगराज सिंह यांच्या क्रिकेटिंग करिअरबद्दल बोलायचं झाल्यास ते माजी वेगवान गोलंदाज आहेत. त्यांनी एक टेस्ट आणि 6 वनडेमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलय. योगराज सिंह यांनी एका टेस्ट मॅचमध्ये एक विकेट घेतला. तेच 6 वनडेमध्ये चार विकेट काढले. एकूण 7 सामन्यांच्या इंटरनॅशनल करिअरमध्ये 11 धावा आणि 5 विकेट काढले.

वर्ल्ड क्लास क्रिकेटपटू घडवला

योगराज सिंह यांनी युवराज सिंह सारखा वर्ल्ड क्लास क्रिकेटपटू तयार केला. जे त्यांना जमलं नाही ते स्वप्न त्यांनी आपल्या मुलामध्ये पाहिलं व भारतासाठी युवराजच्या रुपाने एक यशस्वी क्रिकेटपटू घडवला. 2007 साली टी 20 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप भारताने जिंकला. त्यामध्ये युवराज सिंहची भूमिका महत्वाची होती.