AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाठीत खंजीर खुपसणारे…! युवराज-कोहलीच्या मैत्रीवर योगराज सिंह यांचं खळबळजनक वक्तव्य

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी एखादं वक्तव्य केलं की त्याची चर्चा होत असते. कारण त्यांच्या निशाण्यावर कायम महेंद्रसिंह धोनी असतो. असं असताना त्यांनी यावेळी विराट कोहलीला धारेवर धरलं आहे.

पाठीत खंजीर खुपसणारे...! युवराज-कोहलीच्या मैत्रीवर योगराज सिंह यांचं खळबळजनक वक्तव्य
पाठीत खंजीर खुपसणारे...! युवराज-कोहलीच्या मैत्रीवर योगराज सिंह यांचं खळबळजनक वक्तव्यImage Credit source: Getty Images
| Updated on: Sep 05, 2025 | 7:54 PM
Share

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग याचं भारतीय क्रिकेट संघातील योगदान कोण विसरू शकत नाही. त्यांनी अनेक सामन्यात मॅच विनिंग खेळी केल्या आहेत. दुसरीकडे, त्याचे वडील योगराज सिंग त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. त्यांनी अनेकदा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव यांच्यावर निशाणा साधला आहे. असं असताना आता योगराज सिंग यांच्या निशाण्यावर विराट कोहली आला आहे. योगराज सिंग यांनी आपल्या मुलाखतीत युवराज सिंगच्या मित्रांबाबत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, प्रत्येक जण त्याला घाबरत होतं. कारण तो सर्वात टॅलेंटेड होता. इतकंच नाही तर कोहली-धोनीसह युवराजच्या सर्व सहकाऱ्यांनी युवराजच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. एका युट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग यांना एक प्रश्न विचारला गेला.

विराट कोहली कर्णधार म्हणून युवराजसाठी काही करू शकला असता का? असा प्रश्न योगराज सिंग यांना विचारण्यात आला. धोनीनंतर विराट कोहलीकडे वनडे आणि टी संघाची धुरा आली. पण तेव्हा युवराजला कमी संधी मिळाल्या. त्यानंतर त्याच वर्षी त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळण्यात आलं. तेव्हा विराट कोहली आणि युवराज सिंगच्या मैत्रीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण योगराज सिंगने विराट युवराजचा मित्र नव्हता हे देखील स्पष्ट केलं. ‘यशाच्या पायरीवर कोणीही मित्र नसतं. तुम्ही एकटे असता. या आयुष्यात जिथे पैसा आणि यश आहे तिथे कोणीही मित्र नसतं. मी युवराजला सांगितलं. एक मित्र शोध आणि तो मला दे.’

“यश, पैसा आणि प्रसिद्धीच्या मार्गावर कोणीही मित्र नसतात. नेहमीच पाठीत खंजीर खुपसणारे असतात. नेहमीच असे लोक असतात जे तुम्हाला खाली खेचू इच्छितात. युवराजची प्रत्येकाला भीती वाटत होती की तो माझी खुर्ची हिसकावून घेईल. कारण तो इतका महान खेळाडू होता, ज्याला देवाने निर्माण केले होते. तो महान खेळाडूंपैकी एक होता, प्रत्येकजण त्याला घाबरत होता, धोनीसह इतर सर्व खेळाडू त्याला घाबरत होते.”, असं योगराज सिंग म्हणाले.

योगराज सिंगने सांगितलं की भारतीय संघात इतक्या वर्षात सचिन तेंडुलकरच युवराजचा एकमेव मित्र होता. योगराज सिंग यांनी सांगितलं की, ‘युवराजचा एकमेव मित्र आहे तो त्याला पसंत करतो. तो आहे महान खेळाडू सचिन तेंडुलकर. तो युवराजला भावासारखं मानतो. तो एकमेव व्यक्ती असा आहे की सर्वांना यशस्वी होताना पाहू इच्छितो.’

Follow Us
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?
ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद
Thane ATS : ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
Murasu Cyclone Andhra Pradesh : मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरण....
NCP  : 10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार?
गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा...
Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा
सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या....
Gokul Milk Union : सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या संस्थांवर...
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन