सॅमसंगच्या 'या' दोन फोनवर भरघोस सूट

मुंबई : सध्या मोबाईल दुनियेत प्रत्येक कंपनी फोनवर सूट देत आहे. नुकतेच विवो आणि शाओमीने फोनच्या किंमतीत कपात केली आहे. आता सॅमसंगनेही त्यात उडी मारत Samsung Galaxy J8 आणि Galaxy J6+ च्या किंमतीत कपात केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईचा रिटेलर महेश टेलिकॉमने सॅमसंग स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केल्याची माहिती दिली आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे8 ला …

सॅमसंगच्या 'या' दोन फोनवर भरघोस सूट

मुंबई : सध्या मोबाईल दुनियेत प्रत्येक कंपनी फोनवर सूट देत आहे. नुकतेच विवो आणि शाओमीने फोनच्या किंमतीत कपात केली आहे. आता सॅमसंगनेही त्यात उडी मारत Samsung Galaxy J8 आणि Galaxy J6+ च्या किंमतीत कपात केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईचा रिटेलर महेश टेलिकॉमने सॅमसंग स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केल्याची माहिती दिली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी जे8 ला भारतात 18,990 रुपयात लाँच केले होते. इनफिनिटी डिझाईनचा हा पहिला बजेट स्मार्टफोन होता. आता गॅलेक्सी जे8 स्मार्टफोनमध्ये तीन हजार रुपयांची कपात केल्यामुळे 15,990 रुपयाला हा फोन खरेदी करता येणार आहे. तसेच सॅमसंग गॅलेक्सी जे6 लाँच झाला, तेव्हा 15,990 रुपये किंमतीचा होता. मात्र त्यावरही एक हजार रुपयांची सूट दिली असल्यामुळे फोन 14,990 रुपयात खरेदी करता येणार आहे.
एकीकडे दिवसाला नवीन फोन लाँच होत आहेत, तर दुसरीकडे कंपन्यांकडून फोनच्या किंमतीवर भरघोस सूट मिळत आहे
गॅलेक्सी जे8 स्पेसिफिकेशन

 • 6 इंच एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले
 • 4 जीबी रॅम, 64 इंटरनल स्टोरेज (मायक्रो एसडीकार्ड ने 256 जीबी वाढवता येते)
 • अॅंड्रॉईड 8.1 ऑरियो सिस्टीम
 • रिअर आणि फ्रंट कॅमेरासोबत एलईडी फ्लॅश
 • रिअर कॅमेरा 16+5 मेगापिक्सल
 • फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल
 • 3500mAh बॅटरी क्षमता

 
सॅमसंग गॅलेक्सी जे6 स्पेसिफिकेशन

 • 6 इंच इनफिनिटी डिस्प्ले
 • 1.4 गिगाहर्ट डिवाइस
 • अॅंड्रॉईड ओरियो सिस्टम
 • इनबिल्ट 64 जीबी स्टोरेज (मायक्रो एसडीकार्डने 512 पर्यंत वाढवू शकता.)
 • रिअर कॅमेरा 13+5 मेगापिक्सल
 • सेल्फि कॅमेरा 8 मेगापिक्सल
 • एलईडी फ्लॅश (फ्रंट आणि रिअर कॅमेरा)
 • 3300mAh बॅटरी क्षमता
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *