सिम स्वॅपिंग कशी होते, सिम स्वॅपिंगपासून बचाव कसा कराल?

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंबईतील व्यापाऱ्याचे एका रात्रीत 1.86 कोटी रुपये बँक खात्यातून लुटले गेले होते. हे सर्व सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून करण्यात आले होते. कंपनीच्या बँक खात्यातून ही रक्कम 28 वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार एका रात्रीत घडलेला आहे. सिम स्वॅपिंगद्वारे पैस लुटल्यामुळे सध्या सर्वच मोबाईल युजर्समध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले …

सिम स्वॅपिंग कशी होते, सिम स्वॅपिंगपासून बचाव कसा कराल?

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंबईतील व्यापाऱ्याचे एका रात्रीत 1.86 कोटी रुपये बँक खात्यातून लुटले गेले होते. हे सर्व सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून करण्यात आले होते. कंपनीच्या बँक खात्यातून ही रक्कम 28 वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार एका रात्रीत घडलेला आहे. सिम स्वॅपिंगद्वारे पैस लुटल्यामुळे सध्या सर्वच मोबाईल युजर्समध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा प्रकारच्या घटनांमध्ये व्यक्तीचे सिम कार्ड ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट सिम कार्ड कंपनीला केली जाते. सिम ब्लॉक झाल्यानंतर तातडीने बँकेतील पैस काढण्यासाठी नवीन सिमद्वारे देवाण-घेवाण करण्यासाठी वन टाईम पासवर्ड (OTP) ची रिक्वेस्ट केली जाते. ओटीपी आल्यानंतर त्याच्या मदतीने एका खात्यातून इतर खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. सध्या पैशांची देवाण-घेवाण ही डिजीटल पद्धतीने केली जाते. त्यामुळे बऱ्याच युजर्सची माहिती ऑनलाईन उपलब्ध झाली आहे.

सायबर तज्ञांच्या मते, 2011 नंतर सिम स्वॅपिंगच्या गुन्ह्यांत वाढ झालेली आहे. सिम स्वॅपिंगमध्ये अनेक जणांचा समावेश असतो. सायबर लॉ फाउंडेशनच्या माहितीनुसार 2018 मध्ये भारतात तब्बल 200 कोटी रुपये या पद्धतीने लंपास करण्यात आले आहे.

हे वाचासहा मिस्ड कॉल आणि बँक खात्यातून 1 कोटी 87 लाख रुपये गायब

सिमकार्ड स्वॅपिंग कशी करतात?

  • ज्या लोकांची अशा घटनांमध्ये फसवणूक होते, ते सुशिक्षीत असतात. पण सुरक्षेच्या दृष्टीने निष्काळजी असतात आणि मग याचा फटका त्यांना बसतो. वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यामातून सिम स्वॅपर आपल्यावर लक्ष ठेवून असतात.
  • आपली प्रत्येक माहिती जमा केली जाते. बऱ्याचदा आपल्याला अनोळखी नंबरवरुन फोन करुन ही माहिती घेतली जाते.
  • काही वेळा फिशिंग लिंक पाठवली जाते, ज्यावर क्लिक केल्यावर आपली वैयक्तिक माहिती भरण्यासाठी सांगितले जाते. तसेच हे लोक बँकांचा डेटा खेरदी करतात. तुमची माहिती त्यांना मिळाली की, तातडीने तुमच्या नावाची फेक आयडी कार्ड बनवू शकतात. ज्याच्या मदतीने ते टेलिकॉम कंपनीला तुमचे सिम ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट करतात.
  • टेलिकॉम कपंनीकडून नवीन सिमकार्ड मिळाल्यानंतर नवीन सिमच्या मदतीने ओटीपी मिळवला जातो आणि तुमच्या बँकेतील पैसे लुटले जातात. नवीन सिम स्वॅपरकडे असल्यामुळे ओटीपी कोड त्यांना मिळतो आणि तुमच्या खात्यातील रक्कम ते इतरांना सहज पाठवू शकतात.

सिम स्वॅपिंगपासून बचाव कसा कराल?

प्रत्येक बँक खात्यात इमेल अलर्ट सुविधा दिली पाहिजे. कारण जर अचानक सिम कार्ड बंद झाले, तर कमीत कमी इमेलच्या माध्यमातून तरी आपल्याला समजू शकते की, आपल्या खात्यातून तुमच्या परवानगीशिवाय पैस काढलेआहेत. यामुळे तुम्ही तातडीने बँकेकडे तक्रार करु शकता.

सर्वात महत्वाचे म्हणजे सिम स्वॅपिंगचे काम जास्त करुन शुक्रवार किंवा शनिवारी केले जाते. काही वेळा सुट्टींमध्येही अशी फसवणूक होते. याचे कारण असे की, सुट्टीच्या दिवशी बँक आणि टेलिकॉम कंपनीला संपर्क साधताना आपल्याला अडचणी येतात. यामुळे तुमचे सिम कार्ड जर बंद झाले तर सावधान राहा आणि तातडीने बँकेचं खातं सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *