भारतीयांना हवाय पाच हजारांपेक्षा जास्त किंमतीचा फोन

मुंबई : भारतात सध्या मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन युजर्सची संख्या वाढली आहे. प्रत्येक कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्सच्या देऊन आपला फोन विकत आहे. भारतात सध्या शाओमी, ओप्पो आणि विवो या कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु असल्याचे दिसत आहे. यामध्ये आता व्हिएतनामच्या स्मार्टफोन कंपनीने भारतात पाय रोवण्याचे प्रयत्न करत आहे. या कंपनीकडून नुकताच एक आश्चर्यकारक खुलासा करण्यात आला आहे. …

, भारतीयांना हवाय पाच हजारांपेक्षा जास्त किंमतीचा फोन

मुंबई : भारतात सध्या मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन युजर्सची संख्या वाढली आहे. प्रत्येक कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्सच्या देऊन आपला फोन विकत आहे. भारतात सध्या शाओमी, ओप्पो आणि विवो या कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु असल्याचे दिसत आहे. यामध्ये आता व्हिएतनामच्या स्मार्टफोन कंपनीने भारतात पाय रोवण्याचे प्रयत्न करत आहे. या कंपनीकडून नुकताच एक आश्चर्यकारक खुलासा करण्यात आला आहे. भारतीय युजर्स पाच हजार रुपयांखालील किंमतीचा मोबाईल खरेदी करण्यासाठी इच्छुक नसतात असं या कंपनीकडून सांगण्याता आलं आहे.

व्हिएतनामच्या स्मार्टफोन कंपनीने हा आश्चर्यकारक खुलासा केला आहे. व्हिएतनाम कंपनीने सांगितले आहे की, भारतीय युजर्स पाच हजारापेक्षा कमी किंमतीचा फोन विकत घेण्यास इच्छुक नसतात. तर उत्तम टेक्नोलॉजी आणि सुविधा असणाऱ्या फोनला भारतीय युजर्स जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार असतात.

“हळूहळू पाच हजारापेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोन विक्रीत घट होताना दिसत आहे. असं मोबीस्टारचे उपसंचालक कार्ल गो यांनी सांगितले. ज्या फोनची किंमत पाच हजारांपेक्षा कमी असते. असे स्मार्टफोन खरेदी करण्यास युजर्स आता इच्छुक नाहीत. जे फोन पाच ते दहा हजार रुपयांत उपलब्ध आहेत अशा फोनसाठी युजर्स आता जास्त पैसे द्यायला तयार आहेत”.

कार्ल हे भारतात आले होते तेव्हा त्यांनी आपल्या कंपनीचा 6100 रुपयांचा फोन लाँच केला. हा फोन भारतीय मार्केटमध्ये कसा काम करेल याची काही माहिती नाही. मात्र या फोनला चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमी आणि ओप्पोकडून मोठी टक्कर मिळेल असं बोललं जात आहे. शाओमी भारतातील नंबर एकची कंपनी आहे. कंपनीचा 2018 मधील तिसऱ्या 28.3 टक्के मार्केट शेअर होता.

“मी अशा गोष्टींवर लक्ष देणार आहे की ज्या गोष्टींची युजर्सला गरज आहे. जेणेकरुन ते ब्रँडकडे आकर्षित होतील. ज्यामध्ये कॅमेरा, रॅमसह इतर गोष्टींचा समावेश असेल आणि या सर्व गोष्टी कमी बजेटमध्ये असतील”. असं ही यावेळी कार्ल यांनी सांगितले. कायद्याच्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *