देशातच नाही तर TikTok वरही मोदी लाट!

मुंबई : भारतीय तरुणांमध्ये TikTok या अॅप्लिकेशनचं वेड पाहायला मिळत आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून एका रात्रीत कुणीही प्रसिद्ध होऊ शकतं. या अॅपमध्ये मजेशीर व्हिडीओ पोस्ट केले जातात. चेन्नई उच्च न्यायालयाने या अॅपवर बंदी लावली होती. मात्र, एका आठवड्यातच ही बंदी उठवण्यात आली. त्यानंतर तरुण वर्ग पुन्हा एकदा TikTok वर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. नुकतीच …

देशातच नाही तर TikTok वरही मोदी लाट!

मुंबई : भारतीय तरुणांमध्ये TikTok या अॅप्लिकेशनचं वेड पाहायला मिळत आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून एका रात्रीत कुणीही प्रसिद्ध होऊ शकतं. या अॅपमध्ये मजेशीर व्हिडीओ पोस्ट केले जातात. चेन्नई उच्च न्यायालयाने या अॅपवर बंदी लावली होती. मात्र, एका आठवड्यातच ही बंदी उठवण्यात आली. त्यानंतर तरुण वर्ग पुन्हा एकदा TikTok वर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक ही TikTok वरील नवा ट्रेंड ठरली.

TikTok वरही मोदी लाट

TikTok वर यंदाची लोकसभा निवडणूक चर्चेचा विषय ठरली. निवडणुकांदरम्यान TikTok मोठ्या प्रमाणात  राजकीय व्हिडीओ व्हायरल झाले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जबरदस्त क्रेझ बघायला मिळाली. भाजप नेते जेव्हा निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी रणनीती तयार करत होते, सभा घेत होते. तेव्हा देशातील तरुण वर्ग हा मोदींची रंजक भाषणं व्हायरल करत होता. मोदींच्या भाषणांमध्ये एडिटिंग करुन ती भाषणं TikTok वर शेअर केली गेली.

यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जेव्हा संसदेत डोळा मारला होता, त्या व्हिडीओला ‘आँख मारे, लडका आँख मारे’ या गाण्याशी जोडून व्हायरल करण्यात आलं. त्याशिवाय ‘आप आश्वस्त रहें, आपका ये चौकीदार, पूरी तरह चौकन्ना है’ आणि ‘ज्यादा से ज्यादा ये मेरा क्या कर लेंगे? अरे हम तो फ़कीर आदमी है, झोला लेके चल पड़ेंगे’, या मोदींच्या विधानांवर लिप्सिंग करुन व्हिडीओ पोस्ट करण्यात आले.

TikTok वर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मोदींच्या हातात एक कागद आहे. हा व्हिडीओ संसदेतील आहे. यामध्ये एडिटिंग करुन याला मुन्नाभई एमबीबीएस या सिनेमाच्या “सर, बाहर कोई मरने की हालत में है तो उसको फॉर्म भरना जरुरी है क्या?” या डायलॉगसोबत सिंक करण्यात आलं.

TikTok वर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ वरुन कळून येतं की, मोदींचा लाट ही केवळ देशातच नाही तर TikTok वरही होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *