AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Instagram वर आलं आता नवं फीचर, युजर्सला कमवण्याची मोठी संधी

इन्स्टाग्रामवर आता युजर्सला नवीन अनुभव मिळणार आहे. मेटा कंपनीने इन्स्टावर नवीन फीचर आणलं आहे. ज्याद्वारे तुम्हाला कमाई करण्याची संधी मिळणार आहे.

Instagram वर आलं आता नवं फीचर, युजर्सला कमवण्याची मोठी संधी
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 27, 2023 | 4:45 PM
Share

मुंबई : तरुणांमध्ये सध्या सर्वात लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवर आता मेटा कंपनी युजर्स कमवण्याची संधी देखील देत आहे. म्हणजेच इन्स्टाग्रामवरुन आता युजर्सला पैसे कमवता येणार आहे. इंस्टाग्रामने नुकतेच एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरमुळे युजर्सला त्यांच्या प्रोफाईलच्या बायोमध्ये पाच लिंक्स जोडू शकणार आहेत. ज्यामुळे त्यांना आपला ब्रँड किंवा बिझनेस वाढवण्यासाठी फायदा होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये 5 लिंक जोडता येणार आहेत. या नवीन फीचरमुळे फॉलोअर्स त्या लिंकवर जावू शकतील. ते तुमची आवड, तुमचा आवडता ब्रँड, तुमचा व्यवसाय, याशिवाय, तुम्हाला जे शेअर करायचे आहे ते तुम्ही सहज जोडू शकता.

युजर्स मोबाईल अॅपमध्ये त्यांचे प्रोफाइल संपादित करून लिंक जोडू शकतात. तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम बायोमध्ये एकापेक्षा जास्त लिंक जोडल्यास, तुमच्या प्रोफाईलला भेट देणार्‍या वापरकर्त्याला तुमच्या बायोमधील (तुमची पहिली लिंक) लिंकवर क्लिक केल्याचा मेसेज दिसेल. पुन्हा क्लिक करावे लागेल.

इंस्टाग्राम बायोमध्ये लिंक कसे जोडायचे

– सर्व प्रथम आपल्या मोबाइल डिव्हाइसवर Instagram अॅप उघडा. – स्क्रीनच्या तळाशी उजवीकडे असलेल्या प्रोफाइल आयकॉन पर्यायावर क्लिक करून तुमच्या प्रोफाइलवर नेव्हिगेट करा. – तुमच्या प्रोफाइल फोटोच्या खाली असलेल्या Edit Profile च्या पर्यायावर क्लिक करा. – वेबसाइट किंवा बायो विभाग पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. – येथे तुम्ही थेट लिंक टाइप करू शकता किंवा तुमच्या क्लिपबोर्डवरून पेस्ट करू शकता.

जर तुम्हाला लिंक्स योग्यरित्या सेट करायच्या असतील तर तुम्ही त्यांना ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता. जेणेकरून तुम्हाला जी लिंक आधी दाखवायची आहे त्याप्रमाणे सेट करु शकतील.

इंस्टाग्रामवर कमाई कशी होणार

तुमच्या टॅलेंटच्या आधारे तुम्ही तुमच्या Instagram वर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकता. घरी राहून जेवण बनवण्याच्या पाककृती किंवा टिप्स देऊन पैसेही कमवू शकता. जर तुमच्या फॉलोअर्सला तुमचा कंटेंट आवडत असेल तर तुम्ही त्याला तुमचे उत्पन्नाचे स्रोत बनवू शकता.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?