Apple Airtag च्या मदतीने तुम्ही हरवलेले वस्तू शोधू शकता. याच्या मदतीने मोबाईल ऐपवर लोकेशन शोधता येऊ शकते. या टॅगला तुम्ही बॅग, वॉलेट, पाळीव प्राणी, कार, घराची चावी यांना लावू शकता. आज आपण काही स्वस्तातील लोकेशन फाईंडरबाबत माहिती घेणार आहोत. यांची किंमत ४९९ रुपयांपासून सुरु होते.
Apple AirTag च्या मदतीने जगभरातील लोकांचा फायदा होत आहे. अनेक लोकांच्या चोरीला गेलेल्या बॅग, चाव्या सायकलीसुद्धा शोधण्यास मदत झाली आहे. Apple AirTag ची किंमती ३,४९९ रुपयांचा आहे. परंतू आज आपण काही स्वस्तातल्या प्रोडक्ट संदर्भात माहिती घेऊया. मार्केटमध्ये अनेक ब्रँड आहेत, जे स्वस्तात Apple AirTag सारखी सुविधा देत आहेत.
मार्केटमध्ये Portronics नावाच्या ब्रँडचा ट्रॅकर उपलब्ध आहे. याची किंमत ४९९ रुपये आहे. हे ट्रॅकर तुम्ही कोणत्याही हरवू शकणाऱ्या वस्तूंवर लावू शकता. त्यानंतर तुम्ही त्या वस्तूला शोधण्यासाठी त्याचे लोकेशन ट्रॅक करु शकता. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या घराच्या चावीला हा टॅग लावला असेल आणि ती चावी हरवली असेल तर तुम्ही पाहिजे तेव्हा या चावीचे लोकेशन ट्रॅक करु शकता. त्यामुळे तुम्हाला हरवलेली कोणतीही वस्तू शोधता येणे सोपे होणार आहे.
Portronics चा टॅग लोकेशन फाईंडरला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन सहज खरेदी केले जाऊ शकते. हा एक ब्ल्युटुथ बेस्ड ट्रॅकर आहे. याच्या आत एक सेल लागतो, जो वर्षभर सहज चालतो. या सेलला सहज रिप्लेस करता येऊ शकते.
Portronics चे लोकेशन फाईंडर iOS साथ कंपेटेबल आहे,याचा अर्थ याचा आयफोनवरुन वापर करु शकता. परंतू याला एंड्रॉईड स्मार्टफोनने वापर करता येऊ शकणार नाही.
एकाहून अधिक लोकेशन फाईंडरचा वापर करता येऊ शकतो. याला बॅग, वॉलेट,किचेन, कारची चावी, पाळीव प्राणी आदींवर लावू शकता. जर या वस्तू कधी हरवल्या तर त्यांचे लोकेशन ट्रॅक करणे सोपे होणार आहे.
Portronics च्या शिवाय मार्केटमध्ये अनेक प्रकारचे ट्रॅकर वा लोकेशन फाईंडर उपलब्ध आहेत. याचा वापर करुन तुम्ही वस्तू हरवण्यापासून वाचवू शकता. JioTag चा देखील वापर करु शकता. जिओ टॅगची किंमत ९९९ रुपये आहे. या शिवाय boat, Noise, Moto आदी ब्रँडचे देखील टॅग फाईंडर बाजारात सहज उपलब्ध आहेत.