Airtel : Airtel चे पोस्टपेड प्लॅन महागले! दर महिन्याला मोजावे लागणार इतके पैसे, पण मिळणार हा फायदा

एअरटेलचे पोस्टपेड प्लॅन महागले असून, ग्राहकांच्या खिशाला जबर फटका बसणार आहे. कालपासून हे प्लॅन Airtel ने लागू केले आहेत. कोणते प्लॅन महागले, कितीने महागले, याचा ग्राहकांना काय फायदा मिळणार ते जाणून घ्या सविस्तर 

Airtel :  Airtel चे पोस्टपेड प्लॅन महागले! दर महिन्याला मोजावे लागणार इतके पैसे, पण मिळणार हा फायदा
airtel news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 3:26 PM

मोबाइलचं बील दर महिन्याला भरताना आधीच खिशाला चांगलाच फटका बसतो. त्यात आता एअरटेलच्या रिचार्जच्या किमतीत वाढ केल्याने ग्राहकांना आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. पण याचसोबत काही फायदे देखील ग्राहकांना फ्रिमध्ये देण्याचे एअरटेलने जाहीर केले आहे. त्यामुळे रिचार्ज किती पटीने महाग केलाय. कोणते फायदे मिळणार या बद्दल जाणून घ्या सविस्तर

एअरटेलने आपल्या पोस्टपेड प्लॅनच्या किमतीत 50 रूपयांनी वाढ केली आहे. म्हणजेच वर्षभरात ग्राहकांना 600 रूपये जास्त भरावे लागणार आहेत. मात्र या वाढीबरोबर कंपनीने काही फायजदेही जाहीर केले आहेत. आता पोस्टपेड सिमवर वर्षातून एकदा मोफत इंटरनॅशनल रोमिंगचा फायदा मिळणार आहे. हे नवे प्लॅन 8 ऑक्टोबर 2026 पासून लागू झाले आहेत.

Loading...

 

एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन किती रूपयांचा

Airtel चा वैयक्तिक पोस्टपेड प्लॅन आता 499 रूपयांपासून सुरू होतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा, स्पॅम व फसवणूकीच्या मेसेजपासून संरक्षण , तसेच Xstream play preimium आणि google one सारखे फायदे मिळणार आहेत.

कुटुंबासाठी पोस्टपेड कनेक्शन घ्यायचे असेल तर , कंपनीने वेगवेगळे प्लॅन ठेवले आहेत

749 रूपयांचा प्लॅन – 2 सिम
1,049 रुपयांचा प्लॅन – 3 सिम
1,249 रुपयांचा प्लॅन – 4 सिम
1,449 रुपयांचा प्लॅन – 4 सिम
1,799 रुपयांचा प्लॅन -5 सिम

या प्लॅननुसार अॅमेझॉन प्राईम, jio hotstar, apple music, apple icloud आणि netflix सारखे मनोरंजन व इतर सबस्क्रिप्शनचे फायदेही मिळू शकतात. मात्र कोणते फायदे मिळतील हे संबंधित प्लॅनवर अवलंबून असतील.

रोमिंग कॉलिंगचा मिळणार फायदा

या बदलातील सर्वाच महत्त्वाचा फायदा म्हणजे वर्षातून एकदा पाच दिवसांसाठी मोफत इंटरनॅशनल रोमिंग पॅक.या पॅकमध्ये 5GB डेटा, 60 मिनिटांचं कॉलिंग, 25 आउटगोईंग MMS आणि इनकमिंग MMS सुविधाही मोफत मिळणार आहे. या पॅकचा वापर करण्यासाठी ग्राहकांना परदेशात जाण्याच्या वेळी तो अॅक्टीव्हेट करता येईल.

Airtel च्या माहितीनुसार, जुन्या पोस्टपेड ग्राहकांनाही नव्या प्लॅनमध्ये अपग्रेड करता येईल. त्यासाठी Airtel app किंवा जवळच्या Airtel स्टोरचा वापर करता येईल. जुन्या पोस्टपेड ग्राहकांना साधारण एका महिन्याच्या आत त्यांच्या सध्याच्या प्लॅनच्या जवळच्या अधिक महाग प्लॅनमध्ये शिफ्ट केलं जाऊ शकतं.

त्यामुळे Airtel पोस्टपेड वापरणाऱ्यांनी आपल्या Airtel App मध्ये प्लॅनची माहिती आणि पुढील बील तपासून घ्यावं. प्रवास करणाऱ्यांसाठी हा प्लॅन उत्तमच आहे पण प्रवास न करणाऱ्यांनी मासिक खर्चाचा विचार करूनच प्लॅन निवडणं योग्य आहे.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us